Site icon HW News Marathi

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आईचे निधन

मुंबई। पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)
 यांच्या आई हिराबाई मोदी (Heeraben Modi)
 यांचे निधन झाले आहे. पंतप्रधानांच्या आईचे वयाच्या १०० व्या वर्षी अखरेचा श्वास घेतला. हिराबेन यांच्यावर अहमदाबाद येथील यू एन मेहता रुग्णालयात उपचार सुरू होते. हिराबेन यांचे आज (३० डिसेंबर) पहाटे साडेतीन वाजता त्यांचे निधन झाले. पंतप्रधानांना आईच्या निधनाची माहिती मिळताच अहमदाबादच्या दिशेने रवाना झाले आहे.
हिराबेन यांनी १८ जून रोजी १०० वा वाढदिवस साजरा केला होता. पंतप्रधानांनी आईच्या निधनानंतर ट्वीट करत शोक व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली आहे. पंतप्रधानांनी ४ डिसेंबर रोजी आईची भेट घेतली होती. यावेळी पंतप्रधानांनी आईसोबत गप्पा मारल्या होत्या. तसेच हिराबेन यांनी गुजरात विधानसभा निवडणुकीदरम्यान मतदान देखील केले होते.

Exit mobile version