HW News Marathi
देश / विदेश

राहुल गांधी आरएसएसच्या कार्यक्रमाला जाणार ?

नवी दिल्ली | काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे निमंत्रण देणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. आरएसएसच्या वतीने दिल्लीतील विज्ञान भवनात १७ ते १९ सप्टेंबर दरम्यान ‘भविष्य का भारत’ या कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. याआधी माजी राष्ट्रपती आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रणव मुखर्जी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमात हजेरी लावली होती.

भविष्य का भारत या कार्यक्रमातसाठी माकपाचे नेते सीताराम येचुरी यांना देखील निमंत्रण पाठवण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. या कार्यक्रमासाठी आरएसएसने अनेक राजकीय नेत्यांनाही निमंत्रण पाठवणार आहे. राहुल गांधी पक्षाच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळल्यानंतर भाजप आणि संघावर वारंवार टीका करत आहेत. राहुल गांधी हे सध्या युरोपिय देशांच्या दौऱ्यावर असून या दौऱ्यादरम्यान भाजप आणि संघाची तुलना अरब देशातील कट्टर मुस्लीम संघटना ब्रदरहूडशी केली होती. राहुल यांनी संघाला सर्वसमावेशक भारत ही संकल्पना मोडून काढायची असे विधान केले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कार्ती चिदंबरम यांना अटक

swarit

दिल्लीत प्रजासत्ताक दिनानिमित्त पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तर पंतप्रधानांच्या देशवासियांना शुभेच्छा!

News Desk

#JantaCurfew : जाणून घ्या.. देशभरातील कोणकोत्या सेवा सुरू आणि बंद राहणार

swarit