HW News Marathi
देश / विदेश

राहुल गांधींनी पुन्हा एकदा मोदी सरकारला दिला ‘हा’ सल्ला

नवी दिल्ली | देशात कोरोनाच्या संकटाने सगळेच जण चिंतेत आहेत. अशातच कॉंग्रसचे नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक सल्ला दिला आहे. कोरोना हा रोग आपल्या सगळ्यांपुढे आलेले एक आवाहन जरी असले तरी त्यासोबत आलेली एक संधीही आहे. देशातील शास्त्रज्ञ, डेटातज्ज्ञ, अभियंते, या सगळ्यांनी एकत्र येत या रोगावर अत्याधुनिक पद्धतीने कसा मार्ग काढता येईल, याचा विचार केला पाहीजे, अशा आशयाचे ट्विट त्यांनी केले आहे.

या आधीही २ दिवसांपूर्वी राहुल गांधी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे जनतेशी,पत्रकारांशी संवाद साधला होता. त्यावेळी त्यांनी, ही वेळ मोदींवर टीका करण्याची नसुन एकत्र येऊन काम करण्याची आहे, असे म्हटले होते. तसेच, आपण लवकरात लवकर रॅपिड टेस्टिंगला सुरुवात केली पाहिजे. जर आपण चाचण्यांची संख्या वाढवली नाही तर आपल्याला पुन्हा एकदा लॉकडाऊनचा कालावधी वाढवायला लागेल, असेही त्यांनी म्हटले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

देशाची आर्थिक घडी पूर्ववत होण्याच्या मार्गावर!

News Desk

देशात पुढची १० ते २० वर्षे नरेंद्र मोदींना पर्याय नाही !

Gauri Tilekar

महिलांनी शबरीमला मंदिरात प्रवेश केल्यामुळे राज्यभर बंदची हाक

News Desk