HW News Marathi
देश / विदेश

अध्यक्षपद स्वीकारण्याबाबत “मी विचार करेन”- राहुल गांधी

दिल्ली | निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत काँग्रेस कार्यकारीणीची बैठक सुरु आहे. राहुल गांधी, सोनिया गांधी, अशोक गहलोत, आनंद शर्मा यांच्यासहित पक्षाचे 52 वरिष्ठ नेते या बैठकीला उपस्थित आहेत. या बैठकीत नवीन अध्यक्षपदाबाबत चर्चा होण्याची शक्यता होती. त्यानुसार राहुल गांधींना पुन्हा एकदा पक्षाध्यक्षाचं पद स्विकारण्याची विनंती करण्यात आल्याचं सांगण्यात येतंय.काँग्रेस पक्षाध्यक्ष पदाचा तिढा गेल्या अनेक दिवसांपासून सुटत नसल्याचं पाहायला मिळतंय. त्यातच आज काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत पुन्हा काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांकडून राहुल गांधींना विनंती करण्यात आली…

राहुल गांधी हे लवकरच पक्षाध्यक्ष पद स्विकारतील, असंही काही नेत्यांनी सांगितलं

त्यातच आज काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत पुन्हा काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांकडून राहुल गांधींना विनंती करण्यात आली. त्यावर राहुल गांधींनी सकारात्मक प्रतिक्रीया दिल्याचं सांगण्यात येतंय. तसंच पक्षाच्या नेत्यांकडून विचारधारेच्या पातळीवर स्पष्टता हवी असल्याचं देखील त्यांनी यावेळी बोलून दाखवलं आहे. दरम्यान, येत्या 1 नोव्हेंबरपासून काँग्रेसच्या संघटनात्मक निवडणुकांची प्रक्रिया होण्याची शक्यता आहे. राहुल गांधी हे लवकरच पक्षाध्यक्ष पद स्विकारतील, असंही काही नेत्यांनी सांगितलंय. तसंच सोनिया गांधी यांनी काँग्रेस पक्षातील अंतर्गत टीकाकारांना, खासकरुन ‘जी -२३’ नेत्यांना उद्देशून काही परखड मते मांडली आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ कायम, पेट्रोल १२ पैशांनी महागले

swarit

कमांडर अभिनंदन यांच्या मुक्ततेच्या निर्णयाचे अमेरिकेकडून कौतुक

News Desk

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्राकडून ११२ पद्म पुरस्कार जाहीर

News Desk