HW News Marathi
देश / विदेश

ओडीसा, विदर्भ, मराठवाड्यात पावसाची शक्यता

पुणे | संपूर्ण देशाभरात सध्या मान्सूनचा जोर सध्या क्षीण झाला असून तो परतीच्या मार्गावर आहे. १८ सप्टेंबरला पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होऊन १८ ते २० सप्टेंबर दरम्यान ओडिशासह विदर्भ, मराठवाड्यात काही प्रमाणात पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

हवामान विभागाने मान्सूनच्या परतीच्या प्रवासाची सुरुवात झाल्याची अधिकृत घोषणा केली नसली तरी त्याचा परतीचा प्रवास पश्चिम राजस्थानातून सुरू झाला आहे़ १८ व १९ सप्टेंबरला कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे़ रविवारी सोलापूर जिल्ह्यात दमदार पाऊस झाला. उस्मानाबाद जिल्ह्यात तुळजापूरसह भूमध्ये पहाटे मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला.

मान्सून अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, झारखंड, बिहार, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हरियाणा, पंजाब, हिमाचल प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र, गोवा, छत्तीसगड, तेलंगण, कर्नाटक किनारपट्टी प्रदेश, केरळमधून क्षीण झाला आहे. ८ टक्के कमी पाऊस देशभरात आतापर्यंत सरासरीच्या ८ टक्के कमी पाऊस झाला आहे़ पश्चिम व उत्तर महाराष्ट्रातील बहुतांश धरणे भरली आहेत़.

कमी पावसाच्या पट्ट्यात बरसणार १८ सप्टेंबरला पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची स्थिती आहे. त्यामुळे विदर्भ, मराठवाड्यासह सोलापूर, सांगली या भागात तीन दिवस पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे़.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मनातील कटुतेला तिलांजली देण्याचा आजचा दिवस !

News Desk

एअर इंडियाच्या डेटा सेंटरवर सायबर हल्ला, ४५ लाख प्रवाशांची क्रेडिट कार्डसह महत्त्वाची माहिती ‘लीक’

News Desk

रेल्वेगाड्यांना आता साहित्यकृतींची नावे!

News Desk