HW News Marathi
देश / विदेश

आरबीआय : रेपो रेटमध्ये २५ टक्के कपात, गृह आणि वाहन कर्ज स्वस्त

मुंबई | रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या पतधोरण समितीन रेपो रेटमध्ये २५ टक्के (पाव टक्क्याची कपात) बेसिस पॉइंट्सची कपात करण्यात आली आहे. या निर्णयामुळे आता रेपो रेट ६ टक्क्यांवरून ५.७५ टक्के इतका झाला आहे. आरबीआयने आज (६ जून) पतधोरण जाहीर केल्यानुसार सलग तिसऱ्यांदा रेपो रेटमध्ये कपात करण्यात आली आहे. रेपो रेटमध्ये कपाती झाल्यामुळे गृह कर्ज आणि वाहन कर्ज घेणेही स्वस्त होणार आहे.

आरबीआयच्या गव्हर्नरपदी शक्तिकांता दास यांची नियुक्ती झाल्यापासून सलग तिसऱ्यांदा रेपो रेटमध्ये कपात करण्यात आली आहे. महागाई कमी झाल्याने रेपो रेट जाहीर करताना अर्थव्यवस्थेशी संबंधित मुद्दे आरबीआयकडून विचारात घेतले गेले आहेत. त्यामुळेच आरबीआयने रेपो रेटमध्ये कपात करण्याचा निर्णय घेतला. बँकेला कमी व्याजदरात कर्ज मिळाल्यास याचा फायदा बँक ग्राहकाला मिळणार आहे. त्यामुळे सामान्यांनाही कर्ज घेणे स्वस्त होणार असून, हप्त्यावरचा व्याजदरही कमी होणार आहे.

रेपो रेट म्हणजे काय ?

दैनंदिन व्यवहारांसाठी व्यावसायिक बँकांना मोठ्या रकमेची गरज असते. यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेकडून देशातील बँकांना अल्प मुदतीचे कर्ज दिले जाते. या अल्प मुदतीच्या कर्जावर जो व्याजदर आकारला जातो, त्याला रेपो रेट म्हणतात. रिझर्व्ह बँकेकडून कमी व्याजदराने कर्ज मिळत असेल तर बँका आपल्या ग्राहकांना कमी व्याजदराने कर्जं देतात. रिझर्व्ह बँकेने व्याजदर वाढवले की बँका देखील आपल्या कर्जांचे दर वाढवतात.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राफेलविरोधातील सर्व याचिका सर्वोच्च न्यायालायने फेटाळल्या

News Desk

मिशन किल किम जोनची तयारी पूर्ण 

News Desk

देशातील ‘हे’ राज्य येत्या ७ एप्रिलपर्यंत होणार ‘कोरोना’मुक्त

swarit