HW News Marathi
देश / विदेश

पीएमसीसह ९ बँका बंद होणाऱ्या अफवांचे आरबीआयकडून खंडन

मुंबई | रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पंजाब आणि महाराष्ट्र बँकेवर (पीएमसी) मुंबई बँकेवर सहा महिन्यांसाठी आर्थिक निर्बंध लादले आहेत. यानंतर सार्वजनिक क्षेत्रातील काही बँका बंद होणार असल्याचे मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र, फिरत असलेले सर्व मेसेज निवळ अफवा असून सार्वजनिक क्षेत्रातील बँका बंद होणार नाहीत, असे आरबीआयचे अर्थ सचिव राजीव कुमार सांगितले आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेले मेसेज चुकीचे असून सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना मजबूत करण्याचे काम सरकार करत आहे. त्यामुळे बँका बंद होण्याचा प्रश्नच येत नाही, असे आरबीआयचे अर्थ सचिव राजीव कुमार यांनी ट्वीट करत व्हायरल होणार मेसेज फोटा त्यांच्या ट्वीटमध्ये पोस्ट करत स्पष्ट केले आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होणार मेसेज

आरबीआयकडून सार्वजनिक क्षेत्रातील नऊ बँका कायमस्वरुपी बंद करण्यात येणार आहेत. त्यामुळे बँकांच्या खात्यांमधून तुमचे पैसे आताच काढण्याचे आवाहन, या व्हायरल मेसेजमधून करण्यात आले आहे. युको बँक, आयडीबीआय, बँक ऑफ महाराष्ट्र, आंध्रा बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, देना बँक आणि युनायटेड बँक ऑफ इंडिया यांसह नऊ बँकांचा या मेसेजमध्ये उल्लेख करण्यात आला आहे. या बँकांच्या खात्यांमध्ये तुमचे पैसे असतील तर ते त्वरीत काढा आणि हा मेसेज इतरांनाही पाठवा, असे आवाहनही केले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोल्हापूर-सांगलीमधील महापुरामुळे मुंबईसह ठाण्यातील दंहीहडी रद्द

News Desk

कश्मीरमध्ये भाजपच्या सचिवाची गोळ्या झाडून हत्या

swarit

पीएनबी घोटाळा नव्हे तर ‘या’ कारणासाठी मी देश सोडला !

News Desk