HW News Marathi
देश / विदेश

कर्ज होणार स्वस्त, रिझर्व्ह बँकेकडून रेपो रेटमध्ये कपात

नवी दिल्ली | भारतीय रिझर्व्ह बँकेने रेपो रेटमध्ये पाव टक्क्यांनी कपात केल्याने सध्याचा रेपो रेट ६.२५ टक्के इतका झाला आहे. दरम्यान, रेपो रेटमधील कपात ही गृह कर्जधारकांसाठी लाभदायक ठरू शकते. त्याचप्रमाणे विविध कर्जही स्वस्त होऊ शकतात. येत्या काळात रेपो रेटमध्ये अधिक कपात होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीतील ६ सदस्यांपैकी ४ सदस्यांनी रेपो रेटमध्ये घट करण्याच्या बाजूने मत दिले. रिझर्व्ह बँकेच्या अंदाजानुसार मार्चपर्यंत महागाईचा दर २.८ टक्के इतका राहील. तर एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत महागाईच्या दरात वाढ होऊन तो ३.४ टक्के इतका होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

रेपो रेट म्हणजे काय ?

दैनंदिन व्यवहारांसाठी व्यावसायिक बँकांना मोठ्या रकमेची गरज असते. यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेकडून देशातील बँकांना अल्प मुदतीचे कर्ज दिले जाते. या अल्प मुदतीच्या कर्जावर जो व्याजदर आकारला जातो, त्याला रेपो रेट म्हणतात. रिझर्व्ह बँकेकडून कमी व्याजदराने कर्ज मिळत असेल तर बँका आपल्या ग्राहकांना कमी व्याजदराने कर्जं देतात. रिझर्व्ह बँकेने व्याजदर वाढवले की बँका देखील आपल्या कर्जांचे दर वाढवतात.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“वाह रे मोदी तेरा खेल”; इंधन दरवाढीविरोधात युवा काँग्रेस आक्रमक

News Desk

न्यूज चॅनल आणि वृत्तपत्रांसाठी फेसबुकने तयाक केला इन्वेस्टमेंट फंड

swarit

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची तब्येत आणखी खालावली

News Desk