HW News Marathi
देश / विदेश

राफेल करारावरून संजय राऊत यांची भाजपवर सडकून टीका

नवी दिल्ली | शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी ‘राफेल करार हा बोफोर्स घोटाळ्याचा बाप आहे’ असा टोला लगावला आहे. देशात गेल्या अनेक महिन्यांपासून राफेल करार प्रकरण हे चांगलेच तापलेले आहे. राफेल करारावरून काँग्रेसने वारंवार भाजप सरकारवर टीका केली आहे. तर काँग्रेसच्या प्रत्येक टीकेवर भाजपच्या नेत्यांनीदेखील वेळोवेळी प्रत्युत्तर दिले आहे. आता संजय राऊत यांनी राफेल करारावरून भाजप सरकारला टोला लगावला आहे.

भारत सरकारनेच फ्रेंच विमान कंपनी ‘द सॉल्ट एव्हिएशन’ ला अनिल अंबानी यांच्या रिलायन्स कंपनीचे नाव सुचविले होते. त्यामुळे ‘द सॉल्ट एव्हिएशन’ कडे या कंपनी व्यतिरीक्त दुसरा पर्याय नव्हता.अशी माहिती फ्रान्सचे माजी राष्ट्रपती फ्रांस्वा ओलांद यांनी दिली होती. ओलांद यांनी दिलेल्या माहितीनंतर, भाजप सरकार आणखीनच अडचणीत आले होते. हीच संधी साधत काँग्रेसने भाजपवर जोरदार टीका केली होती. आता भाजपच्या मित्र पक्षानेही टीकेची संधी सोडलेली नाही.

काय म्हणाले संजय राऊत ?

निवडणुकांपूर्वी दिलेल्या आश्वासनांपैकी एकही आश्वासन सरकारने पूर्ण केलेले नाही असे यावेळी संजय राऊत यांनी म्हटले आहे. काँग्रेसच्या काळात प्रत्येक लढाऊ विमानासाठी ५२७ कोटी रुपये एवढा खर्च सांगण्यात आला होता. परंतु भाजप सरकारच्या काळात प्रत्येक विमानासाठी हा खर्च १५७० कोटी रुपये एवढा करण्यात आला आहे. म्हणजेच सरकारला प्रत्येक लढाऊ विमानामागे तब्बल १ हजार कोटींचा दणदणीत नफा झाला असल्याचा आरोपही संजय राऊत यांनी केला आहे.

विशेष म्हणजे शिवसेना नेते संजय राऊत यांनी यावेळी राहुल गांधीं यांचे कौतुक केले आहे. बोफोर्स घोटाळ्यात काँग्रेसच्या सोनिया गांधींसह संपूर्ण कुटुंबावर ६५ कोटींची लाच घेतल्याचा आरोप करणारे आता सत्तेत असून आज त्यांच्यावर राफेल विमान करारामध्ये ७०० कोटी रुपयांची लाच घेतल्याचाही आरोप आहे. त्यामुळेच राफेल हा बोफोर्सचा बाप आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#AyodhyVerdict | सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाला आव्हान देणार, ‘मुस्लीम लॉ बोर्डा’चा निर्णय

News Desk

आयपीएस अधिका-याचा भाऊ बनला दहशवादी

News Desk

सुरत येथे तक्षशिला इमारतीला भीषण आग, ११ जणांचा मृत्यू 

News Desk