Site icon HW News Marathi

काँग्रेस अध्यक्ष पदाच्या निवडणुकीपूर्वी जाहीरनामा प्रसिद्ध करताना शशी थरुर म्हणाले…

मुंबई | काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष पदाची निवडणूक धुमधाम सुरू आहे. या निवडणुकीत काँग्रेसचे राज्यसभा खासदार मलिकाअर्जुन खरगे विरुद्ध काँग्रेसचे लोकसभेचे खासदार शशी थरूर (Shashi Tharoor) यांच्यात सामना पहायला मिळणार आहे. काँगेस पक्षाच्या अध्यक्षपदासाठी येत्या १७ ऑक्टोबरला काँग्रेस अध्यक्ष पदाची निवडणूक पार पडणार आहे. तर १९ ऑक्टोबरला याचा निकाल जाहीर होणार आहे. या पार्श्वभमीवर काल (६ ऑक्टोबर) केरळमध्ये शशी थरूर यांनी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला.

थरूर यांच्या जाहीरनाम्यात, ‘2024 लोकसभा निवडणुकीत भाजपला सामोरे जाण्यासाठी काँग्रेसने पक्षाच पुनरुज्जीवन केले पाहिजे’, असे म्हटले. तामिळनाडूमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना ते पुढे म्हणाले, ” पक्षाचे पुनरुज्जीवन झाले पाहिजे, कार्यकर्त्यांना सशक्त केले पाहिजे. आणि लोकांशी संपर्क वाढवला पाहिजे. मला विश्वास आहे की, यामुळे काँग्रेसला मदतच होईल. 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपशी सामना करण्यासाठी आम्ही तयार आहोत”, असेही त्यांनी स्पष्ट केले.

माल्लिकर्जून खरगे यांच्याबद्दल आदर – थरूर

जाहीरनामा प्रसिद्ध करताना बोलताना थरूर म्हणाले, “माल्लिकर्जून खरगे पक्षाचे ज्येष्ठ नेते असून मला त्यांच्याबद्दल आदर आहे. ही निवडणूक भाजपशी लढण्याच्या वेगवेगळ्या पद्धतीने आधारित मैत्रीपूर्ण स्पर्धा आहे. तिचा विचारधारेशी काहीही संबंध नाही. कारण दोघेही सारखेच आहोत. पुढे थरूर म्हणाले, “आपल्या पक्षाच्या कार्यपद्धतीत सुधारणा करण्याची आपल्याला गरज आहे. आपल्याला तरुणांना पक्षात सामावून घेऊन त्यांना खरी ताकद देण्याची गरज आहे. त्याच बरोबर कष्टाळू आणि जुन्या कार्यकर्त्यांना अधिक सन्मान देण्याची गरज आहे.” असे ते म्हणाले.

गेहलोत आणि सिंहांनी अध्यक्ष पदाच्या रेसमधून घेतली माघार

काँग्रेसच्या अध्यक्षपद निवडणूक अर्ज भरण्यापूर्वी अनेक नाव चर्चेत होती. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांची नावाची काँग्रेस अध्यक्षपदा साठी चर्चा होती. पण, अखेर गेहलोत यांनी दिल्लीत जाऊन काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट काँग्रेस अध्यक्ष पदाची निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला. राजस्थानमधील राजकीय परिस्थिती पहाता, निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. तर दुसरी कढे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी सुद्धा काँग्रेस अध्यक्ष पदाच्या निवडणुकीतून माघार घेतली होती. दिग्विजय सिंह यांनी अर्ज मागे घेतल्यानंतर म्हणाले, “निवडणूक लढण्याऐवजी मल्लिकार्जुन खर्गे यांना पाठिंबा देत असून त्यांच्या विरोधात लढण्याचा विचार सुद्धा करू शकत नाही. मी आयुष्यभर काँग्रेससाठी काम केले आणि पुढेही पक्षासाठी काम करत राहणार आहे.” असं त्यांनी सांगितले होते.

Exit mobile version