HW News Marathi
देश / विदेश

योगी आदित्यनाथ यांचा नेहमीच आदर करत आलो आहे !

मुंबई | देशाच्या राजकारणातील प्रमुख हिंदुत्ववादी चेहरा म्हणून ओळखले जाणार राजकीय नेता आणि उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा आज जन्मदिवस आहे. आदित्यनाथ यांच्या जन्मदिनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ट्वीट करत खास शैलीत त्यांना शुभेच्छा दिल्या आहे. गेल्या काही दिवसांपासून योगी आदित्यनाथ आणि संजय राऊत यांच्यातील ट्वीटवरील वाकयुद्ध सर्वांना माहिती आहेच.

मग पालघर मॉबलिंचिग, उत्तर प्रदेशमध्ये सांधूची हत्य, आणि महाविकासआघाडी सरकारवर, आदी राजकीय विषयावर योगी आदित्यनाथ आणि संजय राऊत यांच्या वाद सर्वांच्या परिचयचे आहे. राऊत ट्वीटमध्ये म्हणाले, “ऊत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी अदितयनाथ यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. मी त्यांचा नेहमीच आदर करत आलो आहे. अयोध्या लढाईत योगीजींनी नेहमीच मार्गदर्शन केले. त्यांच्या कारकिर्दीत राम मंदिर निर्माण होवो हीच शुभेच्छा!,” असे म्हणाले.

योगी आदित्यनाथ यांचा जन्म ५ जून १९७२ रोजी उत्तराखंडमधील पौढी गढवाल जिल्ह्यात झाला. अजयसिंह बिष्ट हे त्यांचे मूळ नाव. पण गोरखपूरला आल्यावर त्यांचे योगी आदित्यनाथ असे नामकरण झाले. योगी आदित्यनाथ हे वयाच्या अवघ्या २६ व्या वर्षी खासदार बनून लोकसभेत पोहोचले. तर पुढे यशस्वी राजकीय वाटचाल करत ४५ व्या वर्षी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री बनले.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

धोका टळला | चीनचे स्पेस स्टेशन पॅसिफिक महासागरात कोसळले

News Desk

येडियुरप्पा सरकारचा पहिला निर्णय, ‘टीपू सुलतान’च्या जयंतीवर बंदी

News Desk

लोकसभा अध्यक्षपदासाठी राजस्थानमधील ‘या’ खासदाराची निवड

News Desk