HW News Marathi
Covid-19

#HathrasRapeCase | हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणाच्या तपासासाठी SIT ची स्थापना  

नवी दिल्ली | उत्तर प्रदेशमधील हाथरस येथील सामूहिक बलात्कार प्रकरणाने पुन्हा एका संपूर्ण देशाने हादरवून सोडले आहे. याच पार्श्वभूमीवर, उत्तर प्रदेशाचे योगी सरकार त्याचप्रमाणे उत्तर प्रदेश पोलिसांच्या एकंदर कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. याच पार्श्वभूमीवर, आता या सामूहिक बलात्कार प्रकरणाची चौकशी करण्यासाठी आता मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी SIT (Special Investigation Team) स्थापना केली आहे. या SIT पथकाला हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणाचा तपास करुन पुढील ७ दिवसांमध्ये आपला अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर हाथरसयेथील बलात्कार प्रकरणानंतर मोठ्या प्रमाणात टीका होताना पाहायला मिळत आहे. योगी आदित्यनाथ यांच्या राजीनाम्याची मागणीही जोर धरत आहे. त्यातच, उत्तर प्रदेशमध्ये सातत्याने होणाऱ्या महिला अत्याचाराच्या घटना पाहता हे प्रमाण प्रचंड असून राज्यातील या एक कळीचा मुद्दा आहे. याच पार्श्वभूमीवर, एकंदर देशभरातील सर्वच स्तरांतून येणाऱ्या संतप्त प्रतिक्रिया लक्षात घेता मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशचे गृह सचिव भगवान स्वरुप यांच्या अध्यक्षतेखाली SIT ची स्थापना केली आहे. आदेशानुसार, येत्या ७ दिवसांमध्ये ला आपला अहवाल सादर करायचा आहे.

योगी आदित्यनाथ यांनी आपल्या ट्विटमध्ये अशीही माहिती दिली आहे कि, “हा खटला फास्टट्रॅक न्यायालयात चालवला जाईल, त्याचप्रमाणे, कोणतीही दया न दाखवता पीडितेची बाजू प्रभावीपणे मांडू”, असेही आश्वासन यावेळी योगी आदित्यनाथ यांनी दिले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात १ सप्टेंबरनंतर काय? याचे उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिले

News Desk

…तर चंद्रकांत पाटील अन् फडणवीसांनी इगतपुरीला जाऊन विपश्यना करावी !

News Desk

महापुरुषांच्या यादीत छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाचा उल्लेख करावा !

News Desk