HW News Marathi
देश / विदेश

टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीला ह्रदयविकाराचा झटका 

नवी दिल्ली | भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि BCCI अध्यक्ष सौरव गांगुली यांना हृदयविकाराचा झटका आल्याने रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आज सकाळी जिममध्ये व्यायाम करून झाल्यावर त्याला हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यानंतर गांगुलीला दक्षिण कोलकाता येथील वूडलँड या एका खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, त्याच्यावर आज (२ जानेवारी) सांयकाळी अँजिओप्लास्टीची शस्त्रक्रिया होणार आहे.

सूत्रांनुसार गांगुलीला जीममध्ये वर्कआऊट करताना त्रास जाणवू लागला होता. यानंतर गांगुलीने वुडलॅंड्स रुग्णालयात तपासणी करुन घेतली. तपासणीत छातीत गंभीर त्रास असल्याचं निदान झालं. यानंतर रुग्णालयाकडून गांगुलीवर अँजियोप्लास्टी सर्जरी करण्यात येणार आहे. डॉक्टर सरोज मंडल तसेच इतर 3 डॉक्टर हे गांगुलीवर अँजियोप्लास्टी करणार आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मोदींनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन आणि कमला हॅरीस यांचे केले अभिनंदन!

News Desk

तिहेरी तलाक विधेयक राज्यसभेत मांडता आले नाहीच

News Desk

‘अमित शाह संसदेत आले, तर मी टक्कल करेन’, देरेक ओब्रायनचं अमित शहांना आवाहन

News Desk