HW News Marathi
देश / विदेश

लाॅकडाऊन मोडल्याप्रकरणी मंत्र्यांच्या मुलाशी हुज्जत घालणाऱ्या गुजरातच्या सुनिता यादवची बदली…!

गुजरात | देशात सध्या काही राज्यांमध्ये सुरू असलेल्या लॉकडाऊनमध्ये काही नियम शिथिल केले असले तरी काही नियम अजूनही लागू आहेत. सुरतमध्ये कर्फ्यूचे उल्लंघन केल्याची एक घटना घडली. गुजरातचे आरोग्यमंत्री कुमार कानाणी यांचा मुलगा प्रकाश कानाणी कर्फ्युचं उल्लंघन केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आपल्या समर्थकांना सोडवण्यासाठी आले होते. परंतु, महिला कॉन्स्टेबल सुनीता यादवने प्रकाश कानाणी यांना कायदा समजावून सांगत त्यांच्या समर्थकांना सोडण्यास नकार दिला. या सगळ्या प्रकरणात मंत्र्यांशी आणि त्यांच्या मुलाशी हुज्जत घालण्यामुळ् सुनीता यादव यांना बदलीचा सामना करावा लागला.

शुक्रवारी रात्री १० च्या सुमारास कर्फ्यु दरम्यान मंत्री कुमार कानाणी यांचे समर्थक मास्क न घातला सूरतच्या रस्त्यांवर फिरत होते. यादरम्यान, ड्यूटीवर तैनात असलेल्या महिला पोलीस कॉन्स्टेबलने त्यांना रोखले. त्यानंतर प्रकाश कानाणी आपल्या समर्थकांना सोडवण्यासाठी तिकडे पोहोचले. परंतु, महिला कॉन्स्टेबलने त्यांचे ऐकले नाही आणि वडिलांशी बोलणे करून देण्यास सांगितले.

सुनीता यादवने आरोग्यमंत्री कुमार कानाणी यांच्याशी बोलताना त्यांनाचं प्रश्न विचारले की, जेव्हा संपूर्ण शहरात कर्फ्यू लावण्यात आला आहे, तर तुमचे समर्थक मास्क न लावता घराबाहेर कसे पडले? नियम-कायदे सर्वांसाठी वेगवेगळे आहेत का? तसेच, पुढे बोलताना महिला कॉन्स्टेबल म्हणाली की, तुम्ही गाडीत नसून देखील तुमच्या नावाची प्लेट गाडीवर का लावण्यात आली आहे?

दरम्यान, प्रकाश कानाणी यांच्या २ मित्रांना अटक केल्यानंतर काल त्यांना जामीनावर सोडण्यात आले. पोलीस कमिशनर आर. बी. ब्रह्मभट्ट यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. आणि सुनीता यादव या सध्या रजेवर असून त्यांनी याबद्दल कोणतेही वक्तव्य केले नाही आहे. या सर्व प्रकारानंतर सुनीता यादव या रजेवर गेल्या आहेत आणि त्यांनी या प्रकरणावर कोणतेही भाष्य करण्यास नकार दिला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

असा असणार यंदाचा स्वातंत्र्यदिन !

News Desk

“निवडणूक आयोग त्याच मेलेल्या हत्तीचे नातेवाईक आहेत”

News Desk

आरपीएफ जवानाने लहान मुलाचे प्राण वाचवले

swarit