Site icon HW News Marathi

न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड यांची भारताचे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती; ९ नोव्हेंबरला घेणार शपथ

मुंबई। न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड (Justice DY Chandrachud) यांची नियुक्ती देशाचे सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) सरन्यायाधीश (Chief Justice of India) म्हणून केली आहे.  डी. वाय. चंद्रचूड हे देशाचे ५० वे सरन्यायाधीश असणार आहेत.
 न्यायमूर्ती चंद्रचूड हे देशाचे सरन्यायाधीश म्हणून ९ नोव्हेंबरला आपला पदभार स्वीकारतील. राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांनी चंद्रचूड यांची सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती केली आहे. तर सध्याचे विद्यमान सरन्यायाधीश यू. यू. लळित हे ८ नोव्हेंबर रोजी निवृत्त होणार आहेत.
दरम्यान, देशाचे विद्यमान सरन्यायाधीश लळित यांनी त्यांचा उत्तराधिकारी म्हणून न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी शिफारस केली होती. गेली अनेक वर्षे रखडलेला अयोध्या जमीन विवाद, शबरीमाला आणि समलैंगिकता यासारख्या मोठ्या खटल्यांमध्ये ते न्यायाधीश राहिले आहेत.
डी. वाय. चंद्रचूड यांचा अल्प परिचय
न्यायमूर्ती धनंजय यशवंत चंद्रचूड यांचा जन्म ११ नोव्हेंबर १९५९ रोजी झाला. न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी हार्वर्ड विद्यापीठातून कायद्याच्या दोन पदव्या प्राप्त केल्यानंतर ते वयाच्या ३९ वर्षी वरिष्ठ वकील म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. यानंतर १९९८ मध्ये ते भारताचे सॉलिसिटर जनरल म्हणून नियुक्ती देण्यात आले. तसेच वकील करत असतात न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी ओक्लाहोमा विद्यापीठातून ‘आंतरराष्ट्रीय कायदा’ विषय शिकवले. २०१३ मध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. यानंतर न्यायमूर्ती चंद्रचूड यांची तीन वर्षांत सर्वोच्च न्यायालयात नियुक्ती करण्यात आली. न्यायमूर्ती चंद्रचूड यांचे वडील वाय. व्ही चंद्रचूड हे देखील देशाचे सरन्यायाधीश राहिले असून त्यांचे वडील हे सर्वाधिक काळ राहणारे सरन्यायाधीश होते.
Exit mobile version