HW News Marathi
देश / विदेश

स्वाती महाडिक आज सैन्यात रुजू होणार

चेन्नई जम्मू काश्मिरमध्ये शहिद झालेले कर्नल संतोष महाडिक यांच्या पत्नी स्वाती महाडिक आज लेफ्टनंटपदाची शपथ घेतली..गेल्या अकरा महिन्यांच्या खडतर प्रशिक्षणानंतर त्यांची पहिली पोस्टिंग पुणे येथील देहूरोड येथे होणार आहे. सोहळ्यासाठी महाडिक कुटुंबीयांसह स्वाती यांच्या घरचेही चेन्नईत दाखल झाली आहे.

शहीद कर्नल संतोष यांच्या अंत्यसंस्कार विधीदरम्यान स्वाती महाडिक यांनी आपण देशसेवेत रुजू होणार असल्याचे जाहीर केले होते. तसेच आपल्या मुलांनाही सैन्यातच भरती करणार असल्याची घोषणा केली होती. नोव्हेंबर २०१५मध्ये कुपवाडा येथे ४१ राष्ट्रीय राईफल्स बटालियनचे नेतृत्व करताना दहशतवाद्यांच्या हल्ल्यात कर्नल संतोष महाडिक शहीद झाले होते. त्यांच्या या शौर्याबद्दल त्यांना मरणोत्तर ‘शौर्यचक्र’ पुरस्कारही दिला गेला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

केंद्रात संघाचे दोन मंत्री फेल, सुरेश प्रभुंची गच्छंती अटळ ?

News Desk

पोटनिवडणुकीत मुख्यमंत्री पर्रिकर विजयी

News Desk

पंकजा मुंडे यांचे भोपाळ विमानतळावर जंगी स्वागत

News Desk