HW Marathi
देश / विदेश राजकारण

राहुल गांधींसोबत आता तरुण नेत्यांची फौज ! कन्हैया कुमार, जिग्नेश मेवाणी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार

नवी दिल्ली | भारतीय कम्यूनिष्ट पक्षाचे नेते कन्हैया कुमार काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. कन्हैया यांचा काँग्रेस प्रवेश जवळपास निश्चित झाला असून शहीद भगतसिंग यांच्या जन्मदिनी म्हणजेच 28 सप्टेंबर रोजी प्रक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे. विद्यार्थी नेता अशी कन्हैया कुमार यांची ओळख आहे. तसेच कन्हैया यांच्यासोबत गुरजामधील आमदार जिग्नेश मेवाणीही काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. दोघांनीही काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे माजी अध्यक्ष तथा खासदार राहुल गांधी यांची भेट घेतली होती.

त्यामुळे कन्हैया यांचा काँग्रेसला मोठा फायदा होऊ शकतो

अनेक राज्यांत केंद्रीय तसेच राज्य पातळीवर काँग्रेस खिळखिळी झाली आहे. बिहारसारख्या राज्यात काँग्रेसचे फक्त 19 आमदार आहेत. येथे आरजेडीसारख्या इतर प्रादेशिक पक्षांचे प्राबल्य आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने पक्ष मजूबत करण्याकडे लक्ष दिले आहे. त्याचाच एक भाग म्हणून कन्हैयासारख्या तरुण नेत्याला पक्षात सामील करुन घेण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. कन्हैया कुमार तरुण आणि तडफदार आहेत. तसेच तरुण, विद्यार्थ्यांमध्ये ते चांगलेच लोकप्रिय आहेत. त्यांची भाषणं, मांडलेले मुद्दे चर्चेचा विषय ठरतात. त्यामुळे कन्हैया यांचा काँग्रेसला मोठा फायदा होऊ शकतो, असा अदांज काँग्रेसमधील नेते बांधत आहेत. दरम्यान, कन्हैया कुमारने कम्यूनिस्ट पार्टी ऑफ इंडिया या पक्षातर्फे 2019 ची लोकसभा निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. भाजप नेते गिरिराज सिंह यांनी त्यांना पराभूरत केलं होतं.

कम्युनिस्ट पक्षाचे नेते कन्हैया कुमार यांनी काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली होती. ही बैठक शक्य तितकी गुप्त ठेवण्याचा प्रयत्न केला गेला होता. तसेच काँग्रेसमधील बड्या नेत्यांनादेखील या भेटीची कल्पना नव्हती. खुद्द काँग्रेसचे गुजरातचे प्रदेशाध्यक्ष भक्त चरण दास यांनादेखील कन्हैया कुमार आणि राहुल गांधी यांच्यात झालेल्या भेटीची खबर नव्हती. तर दुसरीकडे गुजरातमध्ये आमदार जिग्नेश मेवानी यांच्या रुपात काँग्रेसला तरुण आणि तडफदार चेहरा मिळणार आहे. काही दिवसांपूर्वी मेवाणी यांनीही राहुल गांधी यांची भेट घेतली होती. या भेटीत काँग्रेस प्रेवशाबाबत चर्चा करण्यात आली होती. हे दोन्ही नेते आता येत्या 28 सप्टेंबर रोजी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.

 

 

Related posts

अनिल देशमुख राजीनामा देऊन थेट दिल्लीला रवाना

News Desk

महाराष्ट्राची मातीच वेगळी आहे. चला, हवा येऊ द्या! सामनातून भाजपला इशारा

News Desk

शिवसेना-भाजप युती हिंदुत्त्वासाठी देशप्रेमासाठी !

News Desk