Site icon HW News Marathi

“रिझर्व बँकेच्या नोटांवर गांधींच्या फोटोऐवजी मोदींचा फोटो लावतील…”, तेलंगणाच्या मंत्र्यांचा कॉलेजचे नाव बदलल्यावरुन टोला

मुंबई | “निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांच्या मनात आले तर त्या रिझर्व बँकेच्या नोटावर महात्मा गांधींच्या फोटो ऐवजी नरेंद्र मोदींचा (PM Narendra Modi) फोटो लावण्याचे आदेश देतील”, असे ट्वीट करत तेलंगणा राष्ट्र समितीचे अध्यक्ष आणि उद्योगमंत्री केटी रामा राव (KT Rama Rao) यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. अहमदाबामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव एका वैद्यकीय महाविद्यालयाला दिले आहे. पंतप्रधानांचे नाव कॉलेजला दिल्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे.

केटी रामा राव यांनी ट्वीटमध्ये म्हटले, “अहमदाबादमधील एलजी विद्यालय कॉलेजचे नामकरण नरेंद्र मोदी मेडिकल कॉलेज! सरदार पटेल स्टेडियमचे नाव बदलून नरेंद्र मोदी स्टेडियम असे करण्यात आले आहे. जर एफएम निर्मला जी त्यांच्या मनात आले, तर आरबीआयला लवकरच नवीन चलनी नोटा छापण्याचे आदेश दिले जाऊ शकतात. त्यात महात्मा गांधीजींच्या जागी मोदीजी असेल.”

दरम्यान, अहमदाबादमध्ये एलजी महाविद्यालयाचे नाव बदलून ‘नरेंद्र मोदी मेडिकल कॉलेज’ करण्याचा निर्णय अहमदाबात महानगरपालिकेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यापूर्वी पंतप्रधानांचे नाव अहमदाबाद स्टेडियमला दिले होते. यात अहमदाबाद स्टेडियमचे नावही ‘नरेंद्र मोदी स्टेडिअम’ असे नाव दिले. याआधी अहमदाबाद स्टेडियमचे नाव ‘सरदार पटेल स्टेडियम’ असे होते.

 

 

 

Exit mobile version