HW News Marathi
देश / विदेश

गुजरातमध्ये तणाव, पोलिसांच्या गोळीबारात एक ठार 

दाहोद(वृत्तसंस्था): गुजरातच्या दाहोदमधील जसवाडा गावात काल सायंकाळपासून हिंसासार उफाळला आहे. संतप्त गावकºयांनी पोलीस ठाण्यावर हल्ला चढविल्यानंतर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात एकाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे जसवाडामध्ये जाळपोळ सुरू असून तणाव निर्माण झाला आहे.

पोलिसांनी गावातील एका तरुणाला अटक केली होती. त्या तरुणाचा पोलीस कोठडीतच मृत्यू झाला. त्याबाबतचा एफआयआर लिहिण्यास पोलिसांनी नकार दिल्याने संतप्त झालेल्या गावकºयानी काल गुरुवारी सायंकाळी पोलीस स्टेशनवर मोर्चा काढून हल्ला चढवला. यावेळी गावकºयांनी पोलीस ठाण्याच्या खिडक्यांच्या काचा फोडण्याचा प्रयत्न केला. पोलिसांची एक गाडी जाळण्यात आली आणि काही गाड्यांना आगी लावण्याचा प्रयत्न करण्यात आला. पोलीस ठाण्याबाहेरही गावकºयांनी जाळपोळ केली. पोलिसांनी गावकºयांना पांगविण्यासाठी हवेत गोळीबार केला. त्यात एका गावकºयाचा मृत्यू झाला. दरम्यान, जसवाडामध्ये सध्या मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून गावात तणावाची स्थिती आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मेडिकल अभ्यासक्रमात OBC आणि EWS आरक्षण लागू, मोदी सरकारचा मोठा निर्णय

News Desk

अरुण जेटली एम्स रुग्णालयात दाखल

News Desk

‘वंदे भारत एक्‍स्प्रेस’ १५ फेब्रुवारीला धावणार

News Desk