Site icon HW News Marathi

नितीश कुमार यांच्या मंत्रिमंडळाचा आज होणार विस्तार

मुंबई | बिहारमध्ये आरजेडी-जेडीयू यांचे महागठबंधन असलेले सरकार बिहारमध्ये स्थापन झाले आहे. यानंतर बिहारमध्ये आज नितीश कुमार (Nitish Kumar) आणि तेजस्वी यादव यांच्या नव्या सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार (Cabinet expansion) होणार आहे. या मंत्रिमंडळात 15 जेडीयू तर 15 आरजेडी एकूण 30 आमदार आज (16 ऑगस्ट) सकाळी 11 वाजता राजभवनात मंत्री पदाची शपथ घेणार आहेत. यात जेडीयू, काँग्रेस, अपक्ष आणि हम पक्षाच्या नेत्यांची नावे आहेत.

 

बिहारमधील महागठबंधनमध्ये सात पक्ष एकूण 164 आमदारांचा पाठिंब्याचे पत्र काल नितीश कुमारांनी सोपविले होते. या यादीत विजय चौधरी, बिजेंद्र यादव, श्रवण कुमार, संजय झा, सुनील कुमार या नावांचा समावेश आहे. अपक्षकडून सुमित आणि हम पार्टीचे संतोष सुमन तर काँग्रेस अफाक आलम आणि मुरारी गौतम हे मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.  बिहार विधानसभेची एकूण सदस्यसंख्या २४२ आहे. यात भाजपाचे एकूण ७७ तर जदयुचे ४५ आणि हिंदुस्तानी आवाम मोर्चा (सेक्यूलर) ४, राजद ७९ काँग्रेस १९ सीपीआय (एमएल) १२, सीपीआय १४, एमआयएम आणि अपक्ष प्रत्येकी एक असे बहुमत आहे.

 

जेडीयूमधून यांना मिळाले मंत्री पद

 

संबंधित बातम्या

नितीश कुमार यांनी बिहारच्या मुख्यमंत्री पदाचा दिला राजीनामा

नितीश कुमार यांनी आठव्यांदा घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ, तर तेजस्वी यादव उपमुख्यमंत्री पदी विराजमान

 

 

 

Exit mobile version