Site icon HW News Marathi

निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद; हिमाचल प्रदेश, गुजरात विधानसभेची निवडणूक जाहीर होण्याची शक्यता

मुंबई | हिमाचल प्रदेश (Himachal Pradesh) आणि गुजरात (Gujarat) या दोन राज्यात विधानसभेच्या निवडणुकीची  (Election Commission Of India) आज घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाची आज (14 ऑक्टोबर) दुपारी तीन वाजता पत्रकार परिषद होणार आहे. यात पत्रकार परिषदेत हिमालच प्रदेश आणि गुजरात निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होणार आहे. यामुळे सर्वांचे निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

गेल्या 27 वर्षापासून गुजरातमध्ये भाजपचे सरकार आहे. यापूर्वी गुजरात विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने भाजपला कांटे की टक्कर दिली होती. काँग्रेसने काही मतदारसंघात चांगले यश मिळाले होते. यावेळी भाजपने काँग्रेसने काही आमदार देखील फोडले होते. तसेच काही महिन्यांपूर्वी पाटीदार समाजाचे नेते आणि काँग्रेसचे कार्यकारी प्रदेशाध्यक्ष हार्दिक पटेल यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्याचबरोबर गुजरातच्या महापालिका निवडणुकीत भाजपने एक हाती सत्ता मिळवण्यात यश आले.

तसेच हिमाचल प्रदेशमध्ये 2017 मध्ये विधासभा निवडणुकीत भाजपने 45 जागांवर विजय मिळाला होता. तर काँग्रेसला 20 जागांवर समाधान मानावे लागले होते. तसेच मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने एका जागेवर विजय मिळवला तर दोन जागेवर अपक्षावर विजय मिळाला होता. गेल्या काही महिन्यांपूर्वी पार पडलेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसला चांगलेच यश मिळले होते. यामुळे काँग्रेसमध्ये आशेचा नवीन किरण दिसत आहे.

 

 

Exit mobile version