HW News Marathi
देश / विदेश

 नॅशनल हेराल्ड प्रकरणात ED ने यंग इंडियाचे कार्यालय केले सील

नवी दिल्ली | नॅशनल हेराल्ड प्रकरणात (National Herald Case) अंमलबजावणी संचालनालयाने (ED) यंग इंडिया लिमिटेडचे (Young India Limited) कार्यालय सील केले आहे. ईडीने आज (3 ऑगस्ट) यंग इंडिया कार्यालयावर छापा टाकला होता. यादरम्यान ईडीने यंग इंडिया कार्यालयावर झाडाझडती घेतली. यानंतर ईडीने हे कार्यालय सील केले आहे. यंग इंडिया लिमिटेड कंपनीचे 38 टक्के शेअर्स काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi)  आणि काँग्रेसचे खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्याकडे आहे.

दरम्यान, ई़डीने नॅशनल हेराल्ड हाऊससह 12 ठिकाणी छापे टाकले होते. या प्रकरणी सोनिया गांधी आणि राहुल गांधी दोघांची ईडीकडून चौकशी केली आहे. यंग इंडिया लिमिटेड कंपनी ही जी असोसिएटेड जर्नल्स लिमिटेडने टेकओव्हर केले होते. यंग इंडियाला एक कोटी रुपयांचे कर्ज मनी लाँड्रिंग झाल्याचा संशय ईडीला दिला आहे. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची ईडीने चौकशी केली होती. तेव्हा देशभरात काँग्रेस नेत्यांनी ईडी आणि सरकार विरोधात आंदोलन केले होते.

नेमके काय आहे प्रकरण

पंडित जवाहरलाल नेहरू यांनी ‘नॅशनल हेराल्ड’ हे वर्तमानपत्र पंडित सुरू केले होते. एकेकाळी हे काँग्रेसचे मुखपत्र मानले जात होते. परंतु, काही काळातनंतर ‘नॅशनल हेराल्ड’ हे वर्तमानपत्र बंद पडले. यानंतर सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी २०१२ मध्ये ‘यंग इंडिया’ या वर्तमानपत्राचे हक्क विकत घेतले. या वर्तमानपत्राच्या माध्यमातून काँग्रेस जवळपासू १६०० कोटींची संपत्तीही कमी किंमतीत घेतल्याचा आरोप भाजपचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी केला गेला होता. या प्रकरणी २०१५ मध्ये ईडीने तपास केला होता. हे संपूर्ण प्रकरण गेल्या ७ वर्षापासून न्यायालयात आहेत.

 

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पंजाबी सुप्रसिद्ध गायक आणि काँग्रेस नेते सिद्ध मुसेवाला यांची गोळ्या घालून हत्या

Aprna

उमर खालिदला अटक, दिल्ली दंगलीचा कट रचल्याचा ठपका

News Desk

कोरोना पॉझिटिव्हच्या संपर्कात आल्यामुळे रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांना लागण होण्याची शक्यता

swarit