HW News Marathi
देश / विदेश

तलवारीने कापला नववीतील मुलीचा हात

लखनौ : मुलीचा पाठलाग करून भरबाजारात हल्लेखोराने तलवारीने तिचा हात कापल्याची हादरवून टाकणारी घटना उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खेरी भागात बुधवारी घडली. पीडित मुलगी १५ वर्षांची असून हल्ल्यानंतर जमावाने हल्लेखोराला चोप देतपोलिसांच्या ताब्यात दिले आहे. विनोद चौरसिया असे या हल्लेखोराचे नाव आहे.

लखीमपूर खेरीत नववीत शिकणारी मुलगी बुधवारी दुपारी बाजारपेठेतून जात होती. यादरम्यान वेल्डिंगच्या दुकानात कामकरणाऱ्या विनोद चौरसियाने तिला गाठले. गेल्या काही दिवसांपासून तो तिची छेड काढत होता. मुलीने पालकांनाही याची माहिती दिलीहोती. बुधवारीही विनोदने तिची छेड काढली. मुलीने तिथून पळ काढताच विनोदने तिचा पाठलाग केला. हातात तलवार घेऊन विनोदतिचा पाठलाग करत होता. काही क्षणातच विनोदने तिला गाठले आणि तिच्यावर तलवारीने वार केला. हल्ल्यात तिचा डावा हात कापलागेला.

यानंतर बाजारपेठेत उपस्थित असलेल्या काही नागरिकांनी विनोदला रोखले आणि पुढील अनर्थ टळला. संतप्त जमावानेविनोदला चांगलाच चोप दिला आणि त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. हल्ल्यात जखमी झालेल्या पीडित मुलीला तात्काळ स्थानिकरुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने तिला लखनौतील रुग्णालयात हलवण्यात आले.

दरम्यान, यापूर्वी १० ऑगस्ट रोजी बरेलीत दोन मुलींवर अॅसिड हल्ला झाला होता. त्यामुळे महिलांवरील हल्ले रोखण्यातराज्यातील योगी सरकार अपयशी ठरत असल्याची टीका विरोधक करत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मराठा आरक्षणावर दानवेंचा क्लास लावू, राऊतांचा दानवेंवर घणाघात

swarit

हनीप्रीत बाबा-रहीमसोबत जेलमध्ये भेटणार ?

News Desk

…तेव्हा ‘या’ भूमित छत्रपती शिवाजी महाराजच उभे ठाकतात!

News Desk