HW News Marathi
देश / विदेश राजकारण

लोकसभेत अदानीच्या मुद्द्यांवरून विरोधकांचे गदारोळ; लोकसभेचे कामकाज सोमवारपर्यंत तहकूब

मुंबई | संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरू आहे. संसदेत अदानी समूहाच्या (Adani Group) मुद्यावरून विरोधकांनी संसदेत स्थगत प्रस्ताव मांडण्याची मागणी केली आहे. लोकसभेबरोबर (Lok Sabha) राज्यसभेत देखील याच मुद्यांवर विरोधाकंनी गदारोळ झाल्यानंतर लोकसभेचे कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत आणि राज्यसभेचे काम काज दुपारी अडीज वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. लोकसभेचे कामकाज  सुरू झाल्यानंतर विरोधकांनी पुन्हा एकदा अदानीच्या मुद्यावर गदारोळ घातल्यानंतर लोकसभेचे अध्यक्ष ओम प्रकाश बिर्ला यांनी  लोकसभेचे कामकाज सोमवारपर्यंत (6 फेब्रुवारी) कामकाज तहकूब करण्यात आले. लोकसभा आज (3 फेब्रुवारी) सकाळी 11 वाजता सुरू झाल्यानंतर विरोधकांनी अदानीच्या मुद्यांवरून सभागृहात गोंधळ आणि जोरदार घोषणाबाजी केली.

 

नुकतेच अर्थसंकल्प मांडला असून अर्थसंकल्प आणि इतर महत्वाच्या प्रश्नांवर संसदेत चर्चा होणार आहे. अदानी समूहाच्या मुद्यावर संसदेत लोकसभेच्या अध्यक्षांनी चर्चेसाठी वेगळा वेळ दिला जाईल असे म्हटले होते. तरी सुद्धा संसदेत विरोधकांनी गोंधळ आणि जोरदार घोषणाबाजी केली. संसदेच्या दोन्ही सभागृहात अदानींच्या मुद्यावर गदारोळ झाल्यानंतर कामकाज तहकूब करण्यात आले आहे.

संसदेचे कामकाज सुरु होण्यापूर्वी विरोधकांची बैठक

दरम्यान, लोकसभेचे कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत तर राज्यसभेचे कामकाज अडीच वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले आहे. विरोधकांची आज सकाळी बैठक पार पडली. लोकसभेचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांच्या कक्षात बैठक घेण्यात आली आहे.  यात बैठकीत विरोधकांनी 16 पक्षाचे नेते सहभागी झाले होते. यात काँग्रेस डीएमके, समाजवादी पार्टी, आम आदमी पार्टी, भारत राष्ट्र समिती, शिवसेना, राष्ट्रीय जनता दल, जनता दल युनायटेड, सीपीआय, एनसीपी, नॅशनल कॉन्फरन्स,  केसी (जोस मणी), केसी (थॉमस),सीपीआय (एम), इंडियन यूनिअन मुस्लिम लीग, आणि आरएसपी हे पक्ष सहभागी झाले होते.

काँग्रेसचे एलआयसी आणि एसबीआय कार्यालयासमोर काँग्रेस निदर्शन 

हिंडनबर्ग रिसर्चच्या अहवालानंतर अदानींच्या मुद्यांवर संसदेतील दोन्ही सभागृहात विरोधकांनी गोंधळ झाला. तसेच देशातील सर्व जिल्ह्यात 6 फेब्रुवारीला एलआयसी आणि एसबीआय कार्यालयासमोर काँग्रेस निदर्शन करणार आहेत. हिंडनबर्ग रिसर्चने अदानी समुहाविरोधात 106 पानी अहवाल सादर केला.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राफेल विमान कराराची कागदपत्रे गहाळ झाली, याचा अर्थ ती खरी होती !

News Desk

#LokSabhaElections2019 : अभिनेत्री उर्मिला मातोंडकरचा काँग्रेसमध्ये प्रवेश

News Desk

राजदंड पळवूनही सभागृह सुरु ठेवणे म्हणजे सार्वभौम सभागृहाचा अवमान । जितेंद्र आव्हाड

News Desk