HW News Marathi
देश / विदेश

‘चीनी हॅकर्स’च्या कोविड ईमेल पासून सावध, महाराष्ट्र सायबर विभागाकडून नागरिकांना आवाहन

मुंबई | सध्याच्या काळात भारत-चीन बॉर्डर वरील वाद पाहता, चायनीज हॅकर्स आता भारतावर मोठा सायबर हल्ला करण्याची शक्यता असल्याचे समजते. हा सायबर हल्ला करण्यासाठी चीनी हॅकर्स एका ईमेलचा वापर करत आहेत. त्यापासून सावधानता बाळगावी, असे आवाहन महाराष्ट्र सायबर विभागामार्फत करण्यात येत आहे.

चीनच्या हॅकर्सनी 20 लाख लोकांना ईमेलद्वारे टार्गेट करण्याचा प्लान केला आहे. यामध्ये एक ईमेल आयडीदेखील समोर आला आहे. चीनी हॅकर्स ncov2019@gov.in या ईमेलच्या माध्यमातून भारतावर सायबर हल्ला करणार आहे. या सायबर हल्ल्यामध्ये भारतीयांची खासगी आणि आर्थिक माहिती उघड होण्याची भीती आहे. तुम्हाला आकर्षित करणारा/ आर्थिक प्रलोभन देणारा विषय [Email Subject] असलेला ईमेल पाठवला जाईल. जसे की Free Covid Test, Free Covid-१९Kit. त्या ईमेल मध्ये काही लिंक क्लिक करण्यासाठी किंवा अटॅचमेंट डाउनलोड करण्यासाठी सांगितले असेल. हा खोटा ईमेल covid2019@gov.in किंवा ncov२०१९.gov.in अशा प्रकारच्या खोट्या सरकारी ईमेल वरून पाठवल्याचे भासवले जाऊ शकते.

महाराष्ट्र सायबर सर्व नागरिकांना आवाहन करते की, वरील दाखविल्या प्रमाणे या प्रकारच्या कोणत्याही ईमेल ला प्रतिसाद देऊ नका आणि covid२०१९@gov.in किंवा ncov२०१९.gov.in या ईमेल आयडीने जर तुम्हाला कोणताही मेल किंवा फाईल्स आल्या तर त्या ओपन करू नका किंवा कोणताही रिप्लाय या मेलवर देऊ नका. सायबर सुरक्षा संगणक आणि मोबाईल साठी एक चांगला, अपडेटेड आणि अधिकृत [Paid/Licensed] अँन्टी व्हायरस वापरावा. संगणकातील सॉफ्टवेअर आणि मोबाईल मधील अॅप नियमित पणे अपडेट करा. कठीण आणि मोठे पासवर्ड ठेवा आणि ते नियमितपणे बदलत राहा, तुमच्या महत्वाच्या माहितीचा नियमित बॅकअप घ्या. प्रलोभने देणारे संशयास्पद ईमेल उघडू नये. त्यातील लिंक वर क्लिक करू नये. त्यातील अटॅचमेंट डाउनलोड करू नये आणि उघडू नये. खोट्या आणि प्रलोभने देणाऱ्या ईमेल आणि वेबसाईट पासून सावध राहा. असुरक्षित आणि संशयास्पद वेबसाईटवर तुमची महत्वाची माहिती जसे कि युजर नेम, पासवर्ड, कार्ड नंबर, पिन नंबर, ओटीपी तसेच इतर गोपनीय माहिती टाकू नका, असे आवाहन महाराष्ट्र सायबर विभागामार्फत करण्यात आले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

हैदराबादमध्ये भंगाराच्या गोदामाला भीषण आग, ११ मंजुरांचा मृत्यू

Aprna

अलोक वर्मांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याचा आदेश रद्द

News Desk

लतादीदींच्या अंत्यदर्शनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत दाखल

Aprna