Site icon HW News Marathi

जाणून घ्या… कधी होणार राष्ट्रपती निवडणुकीसाठी मतदान आणि मतमोजणी

मुंबई | देशाच्या राष्ट्रपती निवडणुकीची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाने केली आहे. राष्ट्रपती निवडणूक ही 18 जुलै रोजी मतदान आणि 21 जुलै रोजी मतमोजणी होणार आहे, अशी माहिती मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी आज (9 जून) पत्रकार परिषद घेऊन दिली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ 24 जुलै रोजी संपुष्टात येणार आहे.

दरम्यान, राष्ट्रपती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज 15 ते 29 जूनपर्यंत दाखल करता येणार असून 2 जुलैपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. राष्ट्रपतीची निवडणुक 18 जुलै रोजी बिनविरोध न झाल्यास 21 जुलै रोजी मतमोजणी होणार आहे, अशीही माहिती मुख्य निवडणूक आयोगाने दिली आहे.

राष्ट्रपती निवडणुकीसाठी संसदेचे खासदार आणि विधानसभेचे आमदार मतदान करतात. संसदेत एनडीएची संख्या विरोधकांपेक्षा जास्त आहे. यामुळे एनडीएचा राष्ट्रपतीचा उमेदवार विजयी होण्याची चर्चा आतापासून राजकीय वर्तुळात रंगली आहे. यापूर्वी राष्ट्रपतीच्या झालेल्या निवडणुकीत 50 टक्के मतदान एनडीएचे उमेदवार रामनाथ कोविंद यांना पडले होते.

राष्ट्रपतीच्या निवडणुकीत पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या खासदारांना देखील मतदान करता येणार असून तुरुंगात असलेले खासदार पॅरोलसाठी अर्ज करू शकतात. तुरुंगात असलेले आमदार पॅरोल मंजूर झाल्यास त्यांना निवडणुकीत मतदान करता येईल.

 

 

Exit mobile version