Site icon HW News Marathi

महागाईचा फटका! घरगुती LPG गॅस सिलेंडरच्या किंमतीत 50 रुपयांनी वाढ

मुंबई | घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमती तब्बल 50 रुपयांनी वाढ झाली आहे. यामुळे सर्व सामान्याच्या खिशाला कातरी बसणार आहे. घरगुती गॅस सिलेंडरने एक हजाराचा टप्पा पार केला आहे.  यामुळे आता एका सिलेंडरसाठी 1052. 50 रुपये मोजावे लागणार आहेत.

देशभरात एका घरगुती एलपीजी  गॅसची मुंबईतील किंमत 1052.50 रुपये, दिल्लीत 1053 आणि चेन्नईत 1068.50 एवढी किंमत द्यावी लागणार आहे. देशात गेल्या वर्षभरात घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरची किंमत 200 रुपयांनी वाढली आहे. याआधी दिल्लीत 834.50 रुपये द्यावे लागत  होते. आता त्याच गॅसला 1053 रुपये द्यावे लागणार आहे. याआधी मे महिन्यात घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात 4 रुपयांनी वाढ झाली आहे.

केंद्र सरकारने उज्ज्वला योजनेंतर्गत येणाऱ्या ग्राहकांना प्रति सिलेंडरमागे 200 रुपये सब्सिडी देण्याची घोषणा केली होती. या सस्बिडीनुसार दरवर्षी 12 सिलेंडरवर मिळणार आहे. यानुसार, सरकार योजनेचा फायदा फक्त 9 कोटी नागरिकांना होणार आहे.

 

 

 

Exit mobile version