Site icon HW News Marathi

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात 59 टक्के मतदान

मुंबई | गुजरात विधानसभा निवडणुकीच्या (Gujarat Assembly Election) शेवटच्या टप्प्यासाठी मतदान पार पडले आहे. या निवडणुकीच्या शेवट टप्प्यासाठी आज (5 डिसेंबर) 59 टक्के मतदान झाल्याची माहिती मिळाली आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात 14 जिल्ह्यातील 93 विधानसभा मतदारसंघासाठी मतदान पार पडले आहे. तर पहिल्या टप्प्यात 19 जिल्ह्यातील 89 विधानसभा मतदारसंघात 1 डिसेंबर रोजी मतदान पार पडले असून पहिल्या टप्प्यात 63.3 टक्के मतदान झाले होते. गुजरात विधानसभा निवडणुकीचा 8 डिसेंबर रोजी निकाल हात येणार आहे. यावेळी कळेल की, गुजरातची सत्ता कोणाच्या हाती येणार याकडे सर्वांचे लक्ष लागेल आहे.

दरम्यान, गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यात ७० महिला उमेवार यांच्यासह ७८८ उमेदवार निवडणुकीच्या लढवित आहेत. पहिल्या टप्प्यात काँग्रेस आणि भाजपचे ८९ उमेदवार असून आपने ८८ जागांवर उमेदवार दिले आहेत. एआयएमआयएमने ६ जागेवर उमेदवार दिले आहेत. तर गुजरात विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याच्या मतदानासाठी ८३३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. भाजपला अहमदाबादमधील ९३ जागांपैकी १६ जागा महत्वाच्या मानल्या जात आहेत. दुसऱ्या टप्प्यात आपने ९३ जागांवर उमेदवार दिले आहेत. तर भाजपने सुद्धा ९३ जागांवर उमेदवार दिले आहे. तसेच काँग्रेसने ९० जागांवर उमेदवार दिले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने फक्त दोन जागांवर आपले उमेदवार दिले असून भारतीय आदिवासी पक्षाने १२ आणि बहुजन समाज पक्षाने ४४ उमेदवार दिले आहे.

दुसऱ्या टप्प्यात गुजरातचे मुख्यमंत्री भूपिंद पटेल यांचा घाटलोडिया, पाटीदार समाजाचे नेते म्हणून ओळखले जाणारे हार्दिक पटेल यांचे विरमगाम, गांधीनगर दक्षिणमधून भाजपचे अल्पेश ठाकोर, काँग्रेसमधून बनासकांठा जिल्ह्यातील वडगाव मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.

संबंधित बातम्या

गुजरात निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी मतदान सुरुवात; पंतप्रधान बजावणार मतदानाचा हक्क

 

 

 

 

Exit mobile version