Site icon HW News Marathi

राज्यातील सत्तांतरावरील आजची सुनावणी संपली; सर्वोच्च न्यायालयात ‘या’ तारखेला होणार सुनावणी

मुंबई | महाराष्ट्राच्या सत्तांतरावर 16 मार्चला सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सुनावणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयात आज (2 मार्च) जवळपास 2 तास सुनावणी झाली. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात आज शिंदे गटाकडून ज्येष्ठ वकील हरिश साळवे (Harish Salve) यांनी ऑनलाईन हजेरी लावत युक्तीवाद केला. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बहुमत चाचणीला सामोरे न गेल्यावर हरीश साळवेंनी टीका केली. तसेच जर बहुमत चाचणीदरम्यान महाविकास आघाडीतील पक्षाने साथ सोडली असते. काही होऊ शकले असते? असा सवाल उपस्थित हरिश साळवेंनी करत टीका केली आहे.

दरम्यान, या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू झाल्यानंतर वकील नीरज कौल यांनी युक्तीवात केला. यानंतर हरीश साळवेंनी युक्तीवाद केला. यावेळी बहुमत चाचणीला गेले असेत तर शिंदे गटाने काय भूमिका घेतली असती हे आपण सांगू शकत नाही. जेव्हा शिंदे बहुमत चाचणीला सामोरे गेले. तेव्हा महाविकास आघाडी सरकारचे समर्थनक असलेले 13 आमदार गैरहजर राहिले होते.

राज्यपालांनी उद्धव ठाकरेंना बहुमत चाचणीसाठी बोलाविले होते. मात्र, उद्धव ठाकरेंना बहुमत चाचणीला सामोरे न जाता मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. तेव्हा महाराष्ट्राला मुख्यमंत्री नव्हता. राज्यपालांसमोर शिंदेंने बहुमत चाचणीला बोलविण्यासाठी पर्याय नव्हता. शिंदे बहुमत चाचणीला सामोरे गेले आणि त्यांना बहुमत मिळवण्यात यश आले, असे हरिश साळवेंनी सर्वोच्चन न्यायालयात युक्तीवाद केला.

 

 

Exit mobile version