HW News Marathi
देश / विदेश

सकारात्मक! देशात पहिल्यांदाच समलिंगी न्यायाधीश होण्याची शक्यता

मुंबई | भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच समलिंगी न्यायाधीशाच्या पदी विराजमान होण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमनं वकिल सौरभ कृपाल यांना दिल्ली उच्च न्यायालयाचं न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्याचा प्रस्तावाल मंजुरी देण्यात आली आहे. सरन्यायाधीश एन.व्ही. रमना यांच्या नेतृत्वाखाली सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमनं कृपालांच्या न्यायाधीश पदाच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.

कृपालांच्या उमेदवारीचा निर्णय २०१७ पासून अनेक वेळा पुढे ढकलण्यात आला होता. यानंतर अखरे सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजनियमनं अखेर दिल्ली उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश म्हणून त्यांच्या नावाची शिफारस केली आहे. हा निर्णय ११ नोव्हेंबर रोजी बैठकीत कॉलेजियमनं एका निवेदनात सांगितले.

दरम्यान, दिल्ली उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून तारा वितास्ता गंजू, अनिल दयाल, अमित शर्मा आणि मिनी पुष्कर्णा या चार वकिलांच्यी न्यायाधीश पदाची शिफारशीचा पुनरुच्चार करण्याचाही कॉलेजियनं ठरवला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या संकेस्थळावरील निवेदनामुसार, कॉलेजियमनं ११ नोव्हेंबर रोजी बैठकीत वकील सचिन सिंह राजपूत यांना छत्तीसगड उच्च न्यायायाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती केली आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“काही मिनिटांतच जमिनीचा भाव कसा दोन कोटींवरुन 18.5 कोटी कसा काय होऊ शकतो?”, सेनेचा सवाल

News Desk

#AyodhyVerdict | सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाला आव्हान देणार, ‘मुस्लीम लॉ बोर्डा’चा निर्णय

News Desk

माहीच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी !

News Desk