Site icon HW News Marathi

ज्ञानवापी प्रकरणावर 22 सप्टेंबरला पुढील सुनावणी; वाराणसी जिल्हा न्यायालयाचा निर्णय

मुंबई | ज्ञानवापी मशिद (Gyanvapi mosque) प्रकरणाच्या याचिकेवर पुढील सुनावणी 22 सप्टेंबरला होणार आहे. ज्ञानवापी मशिदीतील हिंदू देवदेवतांची दररोज पुजेच्या परवानगीसाठी पाच हिंदू महिलांनी वाराणसीच्या जिल्हा आणि सत्र न्यायालयात (Varanasi District and Sessions Court) याचिका दाखल केली होती. न्यायालयाने हिंदू पक्षकारांची मागणी आज (12 सप्टेंबर) पार पडलेल्या सुनावणीत मान्य केली आहे. परंतु, न्यायालयाने मुस्लिम पक्षकारांची मागणी फेटाळली आहे.

या प्रकरणावर वाराणसीच्या जिल्हा आणि सत्र न्यायालयात आज (12 सप्टेंबर) निकाल येणार आहे. या पार्श्वभूमीवर वाराणसीत मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. ज्ञानवापी मशिदीतील हिंदू देवदेवतांची दररोज पुजेच्या परवानगीसाठी पाच हिंदू महिलांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. तसेच जिल्ह्यातील सीमा आणि हॉटेलसह सोशल मीडियावर पोलीस लक्ष ठेवून आहेत.

 

 

Exit mobile version