May 24, 2019
HW Marathi
देश / विदेश महाराष्ट्र

यंदा मान्सून ६ जूनला केरळमध्ये दाखल होणार | हवामान विभाग

नवी दिल्ली | यंदाचा मान्सून ६ जूनला केरळमध्ये दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. यामुळे महाराष्ट्रात मान्सून उशीरा दाखल होणार असल्याचे म्हटले जात आहे. अंदमानचा समुद्र, निकोबार बेटे आणि बंगालच्या उपसागरात मान्सूनसाठी पोषक वातावरण तयार होत असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. तर स्कायमेटने काल (१४ मे) ४ जून रोजी मान्सून केरळमध्ये दाखल होणार असल्याचे भाकीत केले होते. त्यामुळे मान्सूनचे महाराष्ट्रातलं आगमन लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.

हवामान खात्याने मान्सूनचा अंदाज वर्तविल्यानंतर शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली असून यंदाचा पाऊस सर्वसाधारण असेल, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला. तसेच यंदाच्या मान्सूनमध्ये अल निनोचा प्रभाव कमी असेल. त्याचप्रमाणे यंदाचा मान्सून सरासरीच्या ९६ टक्के पाऊस होणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे.

गत वर्षी २९ मे रोजी मान्सून केरळमध्ये दाखल झाला होता. तर २०१७ मध्ये ३० मे रोजी मान्सून केरळमध्ये आला होता. मान्सूनच्या आगमनाबद्दलचे गेल्या १४ वर्षांतील १३ अंदाज खरे ठरल्याचा दावा हवामान खात्याने केला आहे. केवळ २०१५ मध्ये अंदाज चुकला होता, असे हवामान खात्याने सांगितले. २०१५ मध्ये हवामान खात्याने ३० मे रोजी मान्सून केरळमध्ये पोहोचेल, असा अंदाज वर्तवला होता. मात्र मान्सून जवळपास आठवडाभर उशीरा (५ जून) केरळमध्ये दाखल झाला.

 

Related posts

संकटकाळी स्त्री हि पुरुषापेक्षा जास्त नेटाने उभी राहते कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर

News Desk

राज्यातील सरकारी कर्मचारी आजपासून संपावर, तीन दिवस सुरु रहाणार संप

News Desk

सलग ११व्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत घट

News Desk