Site icon HW News Marathi

हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांच्या गोंधळामुळे लोकसभेचे कामकाज तहकूब

मुंबई | संसदेचे हिवाळी अधिवेशनाला (Parliament Winter Session) आजपासून सुरुवात झाली आहे. परंतु, अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांच्या गोंधळामुळे लोकसभेचे कामकाज दुपारी 12 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले आहे. संसदेचे अधिवेशन आज (7 डिसेंबर) सकाळी सुरू होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी माध्यमांशी संवाद साधला.

पंतप्रधान मोदी म्हणाले, “जी 20 परिषदेच्या अध्यक्षपद भारताला मिळणे ही मोठी संधी असून जगाच्या मंचावर भारताने आपले वेगळे स्थान मिळाले असून यामुळे जगाच्या भाताकडून अपेक्षा वाढल्या आहेत. आपल्याला ताकद दाखवण्याची संधी मिळाली आहे. या जी-20 परिषदेत देशाचे महत्वाचे निर्णय होतील.”

सर्व पक्षाच्या प्रमुखांशी माझी चर्चा झाली आहे. अधिवेशनात देशाच्या विकासाच्या उंचीवर घेऊन जाण्यासाठी अनेक महत्वाचे पूर्ण निर्णय घेण्याचा प्रयत्न असेल. सर्व राजकीय पक्षांशी चांगली चर्चा झाली आहे. यांचे प्रतिबिंब सभागृहात देखील दिसून येतील. या चर्चे विरोधी पक्षातील खासदारांनी स्थगिती आणि गोंधळामुळे बोलण्याची संधी मिळत नसल्याचे म्हणणे मांडले आहे. या सर्व पक्षाच्या खासदारांच्या वेदना समजून घेतल्या पाहिजे. लोकशाहीसाठी हे गरजेचे आहे.”

 

Exit mobile version