Site icon HW News Marathi

UP मध्ये 12 वीच्या अभ्यासक्रमातून मुघलांचा इतिहास वगळला; योगी आदित्यनाथांचा निर्णय

मुंबई | उत्तर प्रदेश बोर्ड आणि सीबीएसई बोर्ड यांच्या अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना मुघलांचा इतिहास (Mughal Empire) शिकवला जाणार नाही, असा निर्णय उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी घेतला आहे. उत्तर प्रदेशाच्या भारताचा इतिहास या पुस्तकातून मुघल दरबार हा विषय कमी करण्यात आला आहे. योगी आदित्यनाथ यांच्या निर्णामुळे देशात नव्या वादाला तोंड फुटण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, अकरावीच्या पुस्तकातून  इस्लामचा उदय, संस्कृतीत झालेले मतभेद आणि औद्योगिक क्रांती यासारखे धडे देखील हटवण्यात आले आहेत. 2023-24 या शैक्षणिक वर्षात हे बदल करण्यात येणार आहेत. तसेच नागरिक शास्त्राच्या पुस्तकातून अमेरिकेचे वर्चस्व आणि शीतयुद्ध हे धडे देखील हटवण्यात आले आहेत.

या प्रकरणावर उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री बृजेश पाठक प्रतिक्रिया देताना म्हणाले, “आपली संस्कृती हाच आपला सांस्कृतिक वारसा असून नव्या पिढीला आपण हा वारसा काय होता ते शिकविला पाहिजे. पुरातन काळातील लोकांना संस्कृतीत होते. हा विषय तर शिकविलाच नाही. यामुळे मुघलांच्या इतिहास वगळून हा विषय शिकवणार आहे.”

 

 

 

Exit mobile version