Site icon HW News Marathi

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या रॅलीत गोळीबार; रुग्णालयात दाखल

मुंबई | पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांच्या रॅलीत गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. यात इम्रान खास यांच्यासह पाच जण जखमी झाले असून इम्रान खान यांच्या पायाला गोळी लागल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. गोळीबारीनंतर इम्रान खान यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. तर पोलिसांकडून एका हल्लेखोराला अटक केली आहे.

इम्रान खान यांची ‘हकीकी आझादी’ रॅली वजिराबाद परिसरातील जफरआली खान चौकात पोहोचल्यावर गोळीबारी झाल्याची माहिती मिळाली आहे. या गोळीबारीत इम्रान खान यांच्या पायाला दुखापात झाल्याची माहिती मिळाली असून अन्या चार जण जखमी झाली आहेत. इम्रान खान यांच्यावर रॅलीवर हल्लेखोरांपैकी गोळीबार केल्याची माहिती समोर आली आहे. त्यापैकी एका आरोपीला पाकिस्तानी पोलिसांनी अटक केली आहे. या गोळीत एका जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. इम्रान खान यांच्यावर झालेल्या गोळीबारीच्या घटनेने पाकिस्तानच्या राजकीय वर्तुळा हदरुन केले आहे. सध्या पाकिस्तान आर्थिक अस्थिरतेतून जात आहे.

दरम्यान, पाकिस्तानची पंतप्रधानांवर गोळीबारीची घटना झालेली ही पहिली घटना नाही. तर यापूर्वी पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान बेनिझिर भुत्तो यांच्यावर देखील गोळीबार झाला होता. या गोळीबारीत बेनिझिर भुत्तो यांचा मृत्यू झाला होता. यानंतर इम्रान खान यांच्यावर गोळीबारची घटना झाली आहे.

 

Exit mobile version