HW News Marathi
देश / विदेश राजकारण

ही निवडणूक पुढील २५ वर्षांसाठी गुजरातचे भवितव्य ठरवणार : पंतप्रधान नरेंद्र मोदी

मुंबई – गुजरातमधील आगामी विधानसभा निवडणूक (Gujarat Assembly Elections) पुढील २५ वर्षांसाठी राज्याचे भवितव्य ठरवणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी गुरुवारी सांगितले. भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या समर्थनार्थ बनासकांठा (Banaskantha) जिल्ह्यातील पालनपूर (Palanpur) शहरात एका निवडणूक रॅलीला संबोधित करताना मोदी म्हणाले की, “गुजरात आणि केंद्रातील सत्ताधारी भाजपने आतापर्यंत अनेक विकासकामे केली असली तरी, पण आता मोठी झेप घेण्याची वेळ आली आहे.”

गुजरात विधानसभेसाठी 182 जागांवर येत्या 1 आणि 5 डिसेंबर रोजी दोन टप्प्यात मतदान होणार असून मतमोजणी 8 डिसेंबर रोजी होणार आहे. बनासकांठा जिल्ह्यात ५ डिसेंबरला दुसऱ्या टप्प्यात मतदान होणार आहे. “ही निवडणूक कोण आमदार बनणार किंवा कोणाचे सरकार सत्तेवर येणार, यासाठी ही निवडणूक नसून ही निवडणूक पुढील 25 वर्षांसाठी गुजरातचे भवितव्य ठरवणारी आहे”, गुजरातला विकसित राष्ट्रांच्या यादीत आणण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे पंतप्रधान म्हणाले.

काय म्हणाले मोदी?

याबाबत बोलताना पंतप्रदान नरेंद्र मोदी म्हणाले, “आता मोठी झेप घेण्याची वेळ आली आहे. गुजरातमध्ये एक मजबूत सरकार बनवण्यासाठी मला तुमच्या पाठिंब्याची गरज आहे. तुम्ही मला तुमच्या समस्या सांगण्याची गरज नाही, कारण मी इथे लहानाचा मोठा झालो आहे. त्यामुळे मला त्या समस्या चांगल्या प्रकारे समजतात. बनासकांठा जिल्‍ह्यातील सर्व जागांवर भाजपला विजयी करण्याचे आवाहन मी तुम्हा सर्वांना करीत आहे”, असे गुजरात निवडणुकीसाठी भाजपचे स्टार प्रचारक मोदी म्हणाले. पुढे बोलताना ते म्हणाले की “गुजरातमधील भाजप सरकारने बनासकांठा आणि आसपासच्या प्रदेशाच्या सर्वांगीण विकासासाठी पर्यटन, पर्यावरण, पाणी, पशुपालन आणि पोषण या सर्व मुद्यांवर लक्ष केंद्रित केले आहे. अत्यंत कमी कालावधीत, आम्ही पाणी टंचाई आणि वीज समस्या सोडवू शकलो. 20 ते 25 वर्षे वयोगटातील तरुणांना कदाचित आज माहित नसेल की काही दशकांपूर्वी परिस्थिती किती वाईट होती”, असेही मोदी म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

विरोधी पक्षाच्या हातात राज्य सरकारशी लढण्याचं एकमेव हत्यार म्हणजे, केंद्रीय तपास यंत्रणा!

News Desk

लॉकडाऊनमध्ये कर्नाटकच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलाचा लग्न सोहळा, कारवाईचे उपमुख्यमंत्र्यांनी दिले संकेत

News Desk

पंतप्रधान मोदींनी राफेल, नोटबंदीसह नीरव मोदींवर माझ्याशी खुली चर्चा करावी !

News Desk