Site icon HW News Marathi

“…एक इंचही जमीन कोणी घेऊ शकत नाही”, अमित शाहांचा चीनला इशारा

मुंबई | “सध्या देशात भाजपचे सरकार आहे. यामुळे एक इंचही जमीन कोणी घेऊ शकत नाही”, अशी पहिल प्रतिक्रिया देशाचे गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी भारत आणि चिनी सैन्यामध्ये अरुणाचल प्रदेशच्या तवांग सेक्टरमध्ये झालेल्या झटापटीवर माध्यमांशी बोलताना दिली आहे. अरुणाचल प्रदेशच्या (Arunachal Pradesh) सीमेवर 9 डिसेंबर रोजी भारत-चीन सैन्यात पुन्हा एकदा झटापट झाल्याची माहिती एएनआय या वृत्त संस्थेने दिली आहे. या घटनेत दोन्ही देशांचे एकूण 30 सैनिक जखमी झाल्याची माहिती एएनआयने दिली.

भारत-चीनसोबत झालेल्या झटापटीसंदर्भात माध्यमांशी बोलताना अमित शाह म्हणाले, “भारत-चीन मुद्यावरून काँग्रेसने राजकारण करणे थांबवले पाहिजे. भारतीय सैन्याने अरुणाचल प्रदेशच्या तवांगमध्ये चिनी सैन्याच्या घुसखोरीचा डाव भारतीय जवानांनी हाडून पाडला आहे. भारतीय सैन्याच्या पराक्रमाचे मी कौतुक करतो. काँग्रेसच्या काळात हजारो किलोमीटर जमीन चीनने कबजा केला आहे. परंतु, देशात सद्या भाजपचे सरकार आहे. यामुळे एक इंचही जमीन कोणीही घेऊ शकणार नाही.”

अमित शाह पुढे म्हणाले, “काँग्रेस सरकारच्या काळात चीनेने भारताची हजारो हेक्टर जमीनवर कबजा केला होता. तर राजीव गांधी फाऊंडेशनने 2005-2006 आणि 2007 या काळात चिनी दुतावासाकडून 1 कोटी 20 लाखांचे अनुदान देण्यात आले होते. एफसीआरचे कायदे त्यांच्या मर्यादेच्या अनुरुप नोटीस पाठविले. यानंतर कायदेशीर प्रक्रियेनंतर गुृह मंत्रालयाने राजीव गांधी फाऊंडेशन रजिस्ट्रेशन रद्द केले आहे.”

 

 

 

Exit mobile version