HW News Marathi
देश / विदेश

जम्मू- काश्मीरमध्ये तीन जवानांना हौतात्म्य

श्रीनगर : काश्मीरमधील अतिरेकी कारवाया अद्यापही शमलेल्या नाहीत. भारतीय सुरक्षा यंत्रणांकडून सातत्याने करण्यात येत असलेल्या कारवायांना न जुमानता, दहशतवादी हल्ले सुरूच आहेत. नुकतेच दक्षिण काश्मीरमधील शोपिया जिल्ह्यात दहशतवाद्यांबरोबर झालेल्या चकमकीत दोन जवानांना हौतात्म्य प्राप्त झाले, तर एका कॅप्टनसमवेत अन्य तिघे जखमी झाले आहेत. पोलिसांनी शनिवारी रात्री ही माहिती दिली.

दरम्यान, जम्मूमधील पुंछ सेक्टर येथेही शस्त्रसंधीचे उल्लंघन करीत नियंत्रण रेषेजवळ भारतीय चौक्यांवर पाकिस्तानी सैनिकांनी शनिवारी सायंकाळी गोळीबार केला. यामध्ये लष्कराच्या एका जवानाला हौतात्म्य प्राप्त झाले,तसेच एक महिलाही ठार झाली.

जैनापोरा येथील अवनिरा गावात सुरक्षा दलांनी शोध मोहीम राबविली. त्या वेळी तेथे लपून बसलेल्यादहशतवाद्यांनी बेछुट गोळीबार सुरू केला. सुरक्षा दलांनीही त्याला चोख प्रत्युत्तर दिले. या गोळीबारात पाच जवान जखमी झाले. त्यांना लष्कराच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. यामध्ये दोन जखमी जवानांचा मृत्यू झाला.तसेच पाकिस्तानकडून झालेल्या गोळीबारात मध्य प्रदेशचे असलेले सुभेदार जगरामसिंह तोमर (४२) गंभीर जखमी झाले. उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पाकिस्तानी सैन्याकडून पुंछ जिल्ह्यातील नियंत्रण रेषेजवळील सीमावर्ती गावे आणि भारतीय चौकीवर गोळीबार आणि तोफांचा मारा करण्यात आला. यामध्ये रकीया बी या ४० वर्षीय महिलेचा मृत्यू झाला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पुन्हा एक लढाऊ मिग विमान कोसळले

News Desk

पीएसआयचा गळा चिरला, बोटे कापली

News Desk

आण्णा हजारेंच्या आरपारच्या क्रांतीला प्रारंभ

News Desk