HW News Marathi
देश / विदेश

७३ व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आज राजपथावर देशाच्या संस्कृती आणि ताकदीचे दर्शन होणार

नवी दिल्ली। संपूर्ण देशात आज ७३ व्या प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो. या पार्श्वभूमीवर सालाबादप्रमाणे यंदा ही दिल्लीच्या राजपथावर देशाच्या सामर्थ आणि संस्कतीचे दर्शन पहायला मिळते. राजपथावरील परेड पहाण्यासाठी राष्ट्रपती, पंतप्रधान, संरक्षण मंत्री, लष्कराच्या तिन्ही शाखांचे प्रमुख म्हणजेच लष्कर, हवाई दल आणि नौदल प्रमुख आणि इतर मान्यवरही यावेळी उपस्थित राहणार आहेत.

यंदाचा प्रजासत्ताक दिनाचा सोहाळा सुरू होण्यापूर्वी नरेंद्र मोदी संचलनाचा सोहळा सुरु होण्यापूर्वी राष्ट्रीय वॉर मेमोरियलला अभिवादन करणार आहेत. सकाळी १०.३० वाजता सुरू होऊन दुपारी १२ वाजता संपन्ना होणार आहे. यंदा राजपथावर २५ चित्ररथ, सैन्यदलांचे १६ ताफे, १७ मिलटरी बँडचे प्रजासत्ताक दिनानिमित्त संचलन होणार आहे. या परेडमध्ये आज एक पीटी ७६ टँक, एक सेंच्युरियन टँक, दोन एमबीटी अर्जुन एमके आय टँक, एक ओटी ६२ टोपस कर्मी वाहक, बीएमपीचे दोन सैन्य लढाऊ वाहन असेल. पीटी ७६, सेंच्युरियन टँख , ओटी ६२ आणि ७५/२४ पॅक होवित्जरने १९७१ च्या युद्धात महत्त्वाची भूमिका बजावली होती. 

प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने होणाऱ्या परेडमध्ये आर्मीची राजपूत रेजिमेंट, आसाम रेजिमेंट, जम्मू काश्मीर लाईट इन्फंट्री, शीख लाईट इन्फंट्री, आर्मी ऑर्डिनन्स कोर रेजिमेंट, पॅराशूट रेजिमेंट आणि भारतीय हवाई दल आणि भारतीय नौदलाच्या एका मार्चिंग दलाचा समावेश असेल. केंद्रीय राखीव पोलीस दल, केंद्रीय औद्योगिक पोलीस दल, सशस्त्र सीमा बल, भारतीय तटरक्षक, सीमा सुरक्षा बल यांच्या पाच तुकड्या संचलनात सहभागी होणार आहेत. भारतीय सेना दल, निमलष्करी सैन्य दलं, दिल्ली पोलीस दल, राष्ट्रीय छात्र सेना आणि राष्ट्रीय सेवा योजना यांच्या एकूण 16 मार्चिंग टीम संचलनात सहभागी होणार आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कृषी कायदा मागे रद्द करण्याबाबत मोदींची महत्त्वाची बैठक

News Desk

विरोधात पोस्ट केल्याने आव्हाडांच्या लोकांकडून जबर मारहाण, तरुणाचा गंभीर आरोप

News Desk

राहुल गांधी यांचे ट्विटर हँडलवरील नाव, फोटोसहीत स्टेटस अपडेट

News Desk