HW News Marathi
देश / विदेश

सौदीमध्ये आजपासून महिला चालविणार गाड्या

रियाध |आजपासून सौदी अरेबियात महिलांना गाडी चालविण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे सौदी अरेबियाच्या रस्त्यांवर महिला वाहने चालवताना येत्या काळात दिसणार आहेत. जगातील सौदी अरेबिया हा एकमेव देश असा होता ज्यामध्ये महिलांना वाहन चालविण्याची परवानी नव्हती मात्र आजपासून या देशातही महिलांना वाहन चालविण्याची परवानगी देण्यात आली आहे.

त्यामळे या आखाती देशात जवळपास 1.51 कोटी महिला आज पहिल्यांदा रस्त्यावर वाहने चालवणार आहेत. गतवर्षी सप्टेंबर महिन्यात सौदीचे किंग सलमान यांनी फर्मान काढून महिलांना वाहन चालविण्यास परवानगी दिली होती. त्यामुळे हा निर्णय महिलांसाठी महत्वपूर्ण आणि ऐतिहासिक मानला जात होता. सौदीमध्ये महिलांसाठी आणि पुरुषांसाठी वेग-वेगळे कायदे आहेत.

त्यामुळे महिलांना वाहन चालवण्‍याची परवानगी दिली नव्हती. परंतु , किंग सलमान यांनी घेतल्याने निर्णयाचे जगभरातून स्वागत करण्यात आले होते. अमेरिकेनेही या निर्णयाचे स्वागत केले होते. सौदीतील महिलांना गाडी चालविण्यास परवानगी दिल्याच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. हा निर्णय देशाला योग्य दिशेला घेऊन जाणारा आहे, असे अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या एका प्रवक्त्याने देखील म्हटले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

संघ कोणत्याही पक्षाचे समर्थन करत नाही | डॉ. भागवत

News Desk

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ठार मारण्याची धमकी !

News Desk

दिल्लीतील महाराष्ट्र सदनाबाहेर भाजप नेत्याची आणीबाणीची पोस्टरबाजी

News Desk