HW News Marathi
देश / विदेश

अखेर नोएडातील अनधिकृत ‘ट्विन टॉवर्स’ केले जमीनदोस्त

नवी दिल्ली | अखेर नोएडातील अनधिकृत बांधण्यात आलेले ट्विन टॉवर्स (Twin Towers) जमीनदोस्त करण्यात आले आहे. गेल्या 9 वर्षांच्या न्यायालयीन लढाईनंतर आज (28 ऑगस्ट) ट्विन टॉवर पाडण्यात आले. ट्विन टॉवर्समधील ‘एपेक्स’ टॉवर 32 मजली असून ‘सियान’ टॉवर्स हे 29 मजली, असे दोन्ही टॉवर पाडण्यात आले.  ट्विन टॉवर हे काही सेकंदात जमीनदोस्त करण्यात आले. ही टॉवर कोसळल्यानंतर संपूर्ण परिसरात धुराचे साम्राज्य पसरले होते.

ट्विन टॉवर पाडण्यासाठी तब्बल 3 हजार 700 किलो स्फोटकांचा वापर करण्यात आला होता. हे टॉवर जमीनदोस्त करण्यापूर्वी खबरदारीचा उपाय म्हणून नोएडा परिसरात 560 पोलीस, 100 राखीव दलाचे जवान आणि चार एनडीआरएफच्या (NDRF) टीम तैनात करण्यात आल्या होत्या. नोएडा येथील सेक्टर 93 अ मधील ‘एमराल्ड कोर्ट गृहनिर्माण’ या टॉवर्समध्ये 850 फ्लॅट्स होते. हे टॉवर्स पाडण्यापूर्वी सर्वांना सुरक्षित स्थळी हलविले असून या परिसरातील जवळपासचे 500 मीटर भाग सील करण्यात आला होता.

ट्विन टॉवर्स नेमके काय आहे प्रकरण

नोएडा येथे ट्विन टॉवर्स अनधिकृतरित्या बांधण्यात आले होते. हे टॉवर नियम धाब्यावर बसून बांधण्यात आले होते. हे टॉन टॉवरमध्ये पाडण्याचे सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिले होते. सुपरटेक कंपनीला न्यू ओखला औद्योगिक प्राधिकरणाने 9 मजल्याचे 14 टॉवर्स बांदण्याची परवानगी 2005 मध्ये दिली होती. या टॉवरमध्ये शॉपिंग कॉम्प्लेक्स आणि बागचा देखील समावेश होता. तर 2009 मध्ये प्रकल्पात सुधारणा करत ‘एपेक्स’ आणि ‘सेयान’ हे दोन टॉवर बांधण्यात आले. या टॉवरच्या नवीन आराखड्याला नोएडा प्राधिकरणाकडून परवानगी दिली होती. परंतु, या टॉवरविरोधात ‘द इमेरॉल्ड कोर्ट ओनर्स रेसिडेन्ट्स वेलफेअर’ने 2012 मध्ये उच्च न्यायालयात धाव घेतली होती. या टॉवरला 2014 मध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयाने टाडण्याचे आदेश दिले होते. अलाहाबाद न्यायालयाच्या निर्णयाविरोधात ‘सुपरटेक’ कंपनी आणि नोएडा प्राधिकरणाने धाव घेतली. न्यायालयाने अलहाबाद न्यायालयाच्या निर्णय कायम ठेवत. हे अनधिकृत टॉवर पाडण्याचे आदेश दिले.

 

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोरोनाचा सामना करण्यासाठी पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून १.४ बिलियन डॉलरचे कर्ज मंजूर

News Desk

भारतीय सैन्याकडून जैश ए मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना कंठस्नान

Gauri Tilekar

योगी सरकारला सर्वोच्च न्यायालयाचा दणका, पत्रकार प्रशांत कनोजियांच्या तात्काळ सुटकेचे आदेश

News Desk