Site icon HW News Marathi

राज्यातील सत्तांतरावरील आजचा युक्तीवाद संपला; पुढील 28 फेब्रुवारीला होणार सुनावणी

मुंबई | राज्यातील सत्तांतरावर सर्वोच्च न्यायालयातील (Supreme Court) आजची सुनावणी संपली आहे. या प्रकरणावर पुढील सुनावणी 28 फेब्रुवारीला होणार आहे. पुढील सुनावणीत अभिषेक मनु संघवी युक्तीवाद करणार आहेत. सर्वोच्च न्यायालयात आज (23 फेब्रुवारी) सुनावणी ही तासभर आधीच कामकाज संपले. सर्वोच्च न्यायालयात सत्तांतरावर तीन दिवस सुनावणी झाली. दरम्यान, या सुनावणीत ठाकरे गटाच्या वतीने ज्येष्ठ वकिल कपिल सिब्बल यांनी अडीच दिवस सर्वोच्च न्यायालयात युक्तीवाद केला. आजच्या सुनावणी ठाकरे गटाचे वकिल अभिषेक मनु संघवी यांनी सर्वोच्च न्यायालयात युक्तीवाद केला.

दरम्यान, पुढील आठवड्यात देखील सलग तीन दिवस सुनावणी होण्याची शक्यता वर्तवली जाते. सर्वोच्च न्यायालयात ठाकरे गटाचा युक्तीवाद अजून पूर्ण झालेला नाही. वकिल अभिषेक मनु संघवी, वकिल देवदत्त कामत यांचा सर्वोच्च न्यायालयात युक्तीवाद हेणे बाकी आहे. त्याच बरोबर शिंदे गटाचा देखील युक्तीवाद होणे बाकी आहे. हे सर्व युक्तीवाद पुढीच्या आठवड्या पूर्ण होण्याची शक्यता वर्तवली जाते. यानंतर सत्तांतरावर सर्वोच्च न्यायालयाकडून निकाल राखून ठेवला जाऊ शकतो.

अभिषेक मनु संघवी यांना काँग्रेस नेत्यांशी संबंधित एका केला उपस्थित रहायचे होते. यामुळे सर्वोच्च न्यायालयाचे कामकाज तासभर आधीच कामकाज संपले.

 

Exit mobile version