HW News Marathi
देश / विदेश

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची ७५वी जयंती, दिग्गज नेत्यांनी वाहिली आदरांजली

नवी दिल्ली | देशाचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची आज (२० ऑगस्ट) ७५वी जयंती आहे. राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त काँग्रेसचे नेते राहुल गांधी, अध्यक्ष सोनिया गांधी, प्रियंका गांधी आणि रॉबर्ट वाड्रा यांनी नवी दिल्लीतील राजघाट येथे जाऊन त्यांच्या समाधीस्थळावर आदरांजली वाहिली. राजीव गांधी यांनी टेलिकॉम, आयटी, पंचायत राजसहीत अन्य कित्येक क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय योगदान दिले आहे. तसेच काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनीही यावेळी राजीव गांधी यांना आदरांजली वाहिली. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, गुलाम नबी आझाद, अहमद पटेल हे यावेळी उपस्थित होते.

राजीव गांधी यांचा जन्म २० ऑगस्ट १९४४ रोजी मुंबईमध्ये झाला. राजकारणात येण्यापूर्वी त्यांनी एअर इंडियामध्ये पायलट म्हणून काम केले होते. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर त्यांच्या नेतृत्त्वाखाली काँग्रेसने ४०१ जागा जिंकल्या होत्या. १९८४ पासून ते १९८९ पर्यंत राजीव गांधी यांनी पंतप्रधानपद भूषवले आहे. आणि २१ मे १९९१ रोजी त्यांची हत्या करण्यात आली आहे. राजीव गांधी यांनी टेलिकॉम, आयटी, पंचायत राजसहीत अन्य कित्येक क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय योगदान दिले आहे. तामिळनाडूतील श्रीपेरंबुदूर येथे महिला सुसाईड बॉम्बरद्वारे एलटीटीईच्या दहशतवाद्यांनी राजीव गांधी यांची हत्या केली होती.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरून राजीव गांधी यांना आदरांजली वाहिली आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आपले वडील आणि माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या माहिती तंत्रज्ञान आणि दूरसंचार क्षेत्रातील योगदानावर भाष्य केले आहे. या आठवड्यात आम्ही राजीव गांधी यांच्या ७५ व्या जयंतीनिमित्त पूर्ण देशात स्मृती कार्यक्रमाचे आयोजन करणार आहोत. आठवड्यात दररोज वडिलांच्या उल्लेखनीय कामगिरीवर लक्ष वेधून घेणार आहे असे म्हटले आहे. सोमवारी आयटी क्षेत्राबाबत माहिती देत त्यांनी ५५ सेकंदांची एक क्लिप जारी केली.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कंगना रणौतने घेतली योगी आदित्यनाथ यांची भेट, अभिनेत्री आता या प्रकल्पाची असणार ब्रँड अ‍ॅम्बेसिडर!

News Desk

उद्धव ठाकरेंचे ‘हे’ बळ पुढे त्यांच्याच कामी येईल, मुनगंटीवारांचा टोला 

News Desk

‘पद्मावत’ सिनेमाला सुप्रीम कोर्टाचा हिरवा झेंडा

News Desk