Site icon HW News Marathi

सुखोई आणि मिराज लढाऊ विमान मध्य प्रदेशमध्ये कोसळले; 2 वैमानिक सुरक्षित तर 1 गंभीर जखमी

मुंबई | मध्य प्रदेशमधील (Madhya Pradesh) मोरेना येथे सुखोई –  30 (Sukhoi-30 )आणि मिराज 2000 (Mirage 2000) ही हवाई दलाची दोन लढाऊ विमाने कोसळल्याची घटना घडली आहे. या अपघातात सुखोई-30 मधील 2 वैमानिक आणि मिराज 2000 मध्ये एक वैमानिक होते. दोन वैमानिक सुरक्षित तर एक वैमानिकाला गंभीर दुखापत झाल्याची माहिती एएनआयने दिली आहे. या अपघाताची माहिती मिळाताच स्थानिक प्रशासनाने बचावकार्य सुरू केले आहे. विमान कोसळल्यानंतर त्यांना आग लागली.

सुखोई-30 आणि मिरज 2000 या दोन्ही लढाऊ विमानांनी मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर एअरबेसवरून उड्डाण केले होते. ग्वाल्हेर येथे सराव सुरू होता. या लढाऊ विमानातील दोन्ही वैमानिकांना सुखरुप बाहेर काढण्यात यश आले आहे. या दोन्ही लढाऊ विमानांची हवेत धडक झाली की नाही. यासंदर्भात हवाई दलाकडून चौकशी करण्यात येणार आहे. तसेच या अपघाताची माहिती संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, सीडीएस अनिल चौहान यांनी हवाई दलाचे प्रमुख व्ही.आर. चौधरी यांनी माहिती घेतल्याची प्रसार माध्यमातून मिळाली आहे.

राजस्थानमध्ये चार्टर्ड विमान दुर्घटना

दरम्यान, दुसरीकडे यूपीच्या आग्रा येथून उड्डाण करणारे चार्टर्ड विमान आज सकाळी राजस्थानच्या भरतपूर जिल्ह्यात कोसळल्याची घटना घडली आहे. या चार्डर्ड विमान दुर्घटनेची माहिती जिल्हाधिकारी अशोक रंजन यांनी दुजोरा दिला असून या दुर्घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली होती.

 

Exit mobile version