HW News Marathi
देश / विदेश

लतादीदींच्या निधनानंतर दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर; राष्ट्रध्वज तिरंगा अर्ध्यावर उतरविला

मुंबई | भारतरत्न आणि गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे आज निधन झाले. लता मंगेशकर यांनी वयाच्या ९३ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. लता मंगेशकर यांच्या निधनानंतर देशभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहिली. “लता दीदींच्या जाण्याने देशात कधी न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे,” असे ट्वीट नरेंद्र मोदी यांनी लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहिली आहे. तसेच लता मंगेशकर यांच्या निधनानंतर केंद्र सरकारने दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला असून राष्ट्रध्वज तिरंगा अर्ध्यावर उतरवण्यात आला आहे.

दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भारतरत्न लता मंगेशकर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत. लता मंगेशकर यांच्या पार्थिवावर दादरच्या शिवाजी पार्कात आज (६ फेब्रवारी) सायंकाळी ६ वाजताच्या सुमारात अत्यंसस्कार करण्यात येणार असून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या अंत्यसंस्काराच्या वेळी ज्या पद्धतीने व्यवस्था केली होती. त्याचप्रमाणे लता मंगेशकर यांच्या अंत्यसंस्काराची देखील व्यवस्था करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर शिवाजी पार्कात स्टेज उभारण्यात येण्यास सुरुवात झाली असून राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी देखील शिवाजी पार्कातील व्यवस्थेची पाहाणी केली.  

लता मंगेशकर यांना न्युमोनिया आणि कोरोनाची लागण झाली. यानंतर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात लता मंगेशकर यांना दाखल करण्यात आले होते. गेल्या महिन्याभरापासून ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. लता मंगेशकर या ३० जानेवारी रोजी कोरोनामुक्त झाल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी प्रसार माध्यमांना दिली होती. यानंतर लता मंगेशकर यांची काल (५ फेब्रुवारी) तब्यात चिंताजनक झाल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यादी नेत्यांनी देखील त्यांची भेट घेऊन त्यांच्या तब्यातीची चौकशी केली होती. 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गुलाम नबी आझाद, मल्लिकार्जुन खर्गेंसह ज्येष्ठ नेत्यांची पक्षाच्या सरचिटणीस पदावरून हकालपट्टी

News Desk

सलमान खानचे ‘चित्रपट’ आणि ‘टीव्ही शो’ भविष्य अंधारात

News Desk

फडणवीसांनंतर शरद पवारांनी मोदींना केलं टार्गेट ! ‘मी मोदींचा गुरू नाही’

News Desk