दंतेवाडा | छत्तीसगडमधील दंतेवाडा येथे आज (८ मे) सकाळी सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली आहे. या चकमकीदरम्यान दोन नक्षलवाद्यांना कंठस्नान खालण्यात सुरक्षा दलाला यश आले आहे. या नक्षलवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.
SP Dantewada Abhishek Pallava says, "District Reserve Guard female commandos “Danteshwari Ladake” also took part in this encounter". 30 women including surrendered Naxals cadres or wives of surrendered cadres were recruited in the only woman DRG platoon in Dantewada.#Chhattisgarh https://t.co/pbzrP8Rezj
— ANI (@ANI) May 8, 2019
सुरक्षा दलाला दंतेवाडा परिसरात नक्षलवादी लपून बसल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे सुरक्षा दलाने दंतेवाडा परिसरात शोध मोहीम राबविण्यात असताना नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलाला चारी बाजूने घेरल्यानंतर त्यांच्यावर गोळीबार करण्यास सुरुवात केली. सुरक्षा दलाने नक्षलवाद्यांच्या गोळीबारीचे चोख प्रत्युत्तर दिले. या गोळीबारीदरम्यान २ नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले.
दंतेवाड्याचे पोलिस निरीक्षक अभिषेक पल्लव यांनी दिलेल्या माहितीनुसार, या कारवाईत जिल्हा रिझर्व्ह गार्ड महिला कमांडो ‘दंतेश्वरी’ने याही सहभागी झाल्या होत्या. डीआरजीच्या या पथकामध्ये आत्मसमर्पण केलेल्या महिला नक्षलवादी आणि आत्मसमर्पण केलेल्या पुरुष नक्षलवाद्यांच्या पत्नींचा समावेश असतो. याच महिला कमांडो नक्षलवाद्यांच्या विरोधातील मोहिमेत उत्कृष्ट कामगिरी केली असल्याची सांगितले.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.