HW News Marathi
देश / विदेश

दिल्लीतून दोन दहशतवाद्यांना अटक

नवी दिल्ली । दिल्ली पोलिसांनी गुरुवारी (६ सप्टेंबर) रोजी मध्ये रात्री लाल किल्ल्याजवळून आयएसआयच्या दोन दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. हे दोन्ही दहशतवादी जामा मशीदीजळच्या बस थांब्यावर थांबले असताना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.

परवेज आणि जमशेद असे या दोन्ही दहशतवाद्यांची नावे आहेत. या दोघांचाही इस्लामिक स्टेट इन जम्मू काश्मीर या दहशतवादी संटनेशी संबंध आहे. या दोघांकडून दोन पिस्तुल, १० काडतुसे आणि ४ मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.शस्त्रे या दोघांनी उत्तर प्रदेशमधून खरेदी केल्यांची माहिती दिल्ली पोलिसांना मिळाली आहे. ही शस्त्रे घेऊन दोघेही दिल्लीहून काश्मीरला जाणार होते.

हे दोघेही दहशतवादी काश्मीरचे रहिवासी असून त्यांच्याविरोधात दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या सर्व प्रकरणाची पोलीस यंत्रणा चौकशी करत आहे. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार पकडण्यात आलेल्या दोन दहशतवाद्यांपैकी परवेज हा दहशतवाद्यांचा भाऊ यांचा जानेवारी महिन्यात एका चकमकीत मारला गेला होता. तसेच परवेज हा आधी हिज्बुल मुजाहिद्दीनशी संबंध होता. परंतु त्यानंतर तो आयएसआयमध्ये गेला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आम्हाला विश्वासात न घेता शासन निर्णय काढला ! राज्य सरकारवर काँग्रेस प्रचंड नाराज

News Desk

साक्रीचा तरूण काश्मीरमध्ये शहीद

News Desk

अखिलेश, लालूप्रसादसह चिराग पासवान यांची सुरक्षा काढली

News Desk