Site icon HW News Marathi

ब्रिटनच्या पंतप्रधान पदाच्या निवडणुकीत लिझ ट्रस यांचा विजय

मुंबई । ब्रिटनच्या (UK) नव्या पंतप्रधान म्हणून लिझ ट्रस (Liz Truss) यांचा विजय झाला आहे.  बोरिस जॉन्सन यांनी जून महिन्यात ब्रिटनच्या पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला होता. यानंतर  ब्रिटनच्या परराष्ट्र सचिव लिझ ट्रस आणि भारतीय वंशाचे ऋषी सुनक या दोघांमध्ये पंतप्रधान पदासाठी चुरशीची लढत पाहायला मिळाली. ब्रिटनसह जगभरात ब्रिटनचा (UK) पंतप्रधान पदी कोण विराजमान होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. यानंतर अखेर आज (५ सप्टेंबर) लिझ ट्रस ब्रिटनच्या पंतप्रधान झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

ब्रिटनच्या पंतप्रधान निवडणुकीत लिझ ट्रस यांना ८१, ३२६ आणि ऋषी सुनक यांना ६०, ३९९  मते मिळाली आहेत. लिझ ट्रस या ब्रिटनच्या तिसऱ्या महिला पंतप्रधान झाल्या आहेत. ब्रिटनच्या पंतप्रधान निवडणुकीचा शेवटच्या टप्प्याचे मतदान शुक्रवारी (२ सप्टेंबर) मतदान पार पडले होते. ब्रिटनमध्ये निवडणुकीच्या निकालापूर्वी आलेल्या सर्वेक्षणात ऋषी सुनक हे लिझ ट्रस यांच्या मागे असल्याचे बोलले जाते होते. लिझ ट्रस ब्रिटनच्या पंतप्रधान झाल्यानंतर म्हटले, “कोरोना महामारीनंतर देशातील कर कमी करण्यासाठी आणि अर्थव्यवस्था वाढवण्यासाठी एक योजना घेऊन येणार आहे,” असे त्या म्हणाल्या.

 

 

Exit mobile version