HW Marathi
देश / विदेश

अशिक्षित लोक देशावरील ओझं! – अमित शाह

पंतप्रधान मोदी यांच्या लोकप्रतिनिधी या नात्याने सुरु केलेल्या राजकीय कारकिर्दीला २० वर्षे पूर्ण झाली आहेत. आधी सलग १३ वर्षे गुजरातचं मुख्यमंत्री पद आणि त्यानंतर लगेचच आतापर्यंतची सलग ७ वर्षे नरेंद्र मोदी हे देशाच्या पंतप्रधानपदी आहेत. दरम्यान, मोदींच्या याच राजकीय प्रवासाच्यानिमित्ताने भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच संसद टीव्हीने एक मुलाखत घेतली. यावेळी अमित शाह यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे. “अशिक्षित लोक हे एका दृष्टीने देशावरील ओझं आहेत”, असं विधान अमित शाह यांनी या मुलाखतीत केलं.

“मोदी गुजरातचे मुख्यमंत्री झाले तेव्हा मुलांचं शाळांमध्ये जाण्याचं प्रमाण कमी होतं. मात्र, त्यानंतर मोदी यांनी एखाद्या उत्सवाप्रमाणे मुलांना शाळेत टाकण्याची मोहीम सुरु केली. पालकांची समिती नेमली, शिक्षकांना जबाबदाऱ्या वाटून दिल्या”, असं सांगतानाच पुढे अमित शाह यांनी या मुलाखतीत एक प्रश्न उपस्थित केला. ते म्हणाले की, “एखादी अशिक्षित व्यक्ती हे देशावरचं ओझं असतं. कारण ना तिला संविधानाने आपल्याला दिलेल्या हक्कांची माहिती असते, ना देशाप्रती असलेल्या आपल्या कर्तव्यांची. मग अशी व्यक्ती एक चांगली नागरिक कशी ठरेल?”

अमित शाह यांनी केलेल्या या विधानाची राजकीय वर्तुळात मात्र जोरदार चर्चा सुरु झाली. सोशल मीडियावर देखील यावरून अनेक टीका टिपण्या झालेल्या पाहायला मिळाल्या.

मोदींच्या कामाची पद्धत कशी?

अमित शाह यांनी पंतप्रधान मोदींच्या राजकीय प्रवासाचं आणि त्यांच्या कामाच्या पद्धतीचं यावेळी तोंडभरून कौतुक केलं आहे. यावेळी अमित शाह यांनी मोदींच्या निर्णय पद्धतीवरही भाष्य केलं आहे. “मोदींचं काम मी अगदी जवळून पाहिलं आहे. ते हुकूमशाही पद्धतीने काम करतात असे आरोप होतात. मात्र, हे सर्व आरोप खोटे आणि तथ्यहीन आहेत. कोणतीही बैठक असली तरी मोदी स्वतः मोजकंच बोलतात, अधिक इतरांचं ऐकतात आणि निर्णय घेतात. आम्हालाच कधी कधी वाटतं की, एवढा काय विचार करायचा?”, असं अमित शाह यांनी यावेळी सांगितलं.

Related posts

पुण्यात १००० लोकांना Quarantine करणारी व्यवस्था शासनाला अर्पण !

Arati More

नागरिकत्व विधेयकाविरोधात शहांवर निर्बंध लादण्याची अमेरिकन आयोगाची मागणी

News Desk

आता सरकारने मास्क, सॅनिटायझर्स रेशनच्या दुकानावर उपलब्ध करावेत !

News Desk