Site icon HW News Marathi

“भारत जोडो यात्रेमध्ये कोरोनाच्या नियमांचे पालन करा…”, केंद्रीय आरोग्य मंत्र्यांचे राहुल गांधींना पत्र

मुंबई | “भारत जोडो यात्रेमध्ये कोरोनाच्या नियमांचे पालन करा अन्यथा भारत जोडो यात्रा थांबवावी”, आशयाचे पत्र केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवी (Mansukh Mandaviya) यांनी काँग्रेसचे खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना दिली आहे. चीनमध्ये कोरोनाचा (Covid 19) उद्रेक होत आहे. यामुळे केंद्र सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून आज (21 डिसेंबर) केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी बैठक बोलविली होती. “कोरोना अजूनही संपलेलान नाही. मी सर्वांनी सतर्क राहण्याचे आणि जागरुक राहावे”, असेही ट्वीट केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी केले आहे.

आरोग्यमंत्र्यांनी पत्रात म्हटले, “भारत जोडो यात्रा ही सध्या राजस्थानमध्ये सुरू असून भारत जोडो यात्रेमुळे कोरोनाचा प्रसार होऊ रुग्णांची संख्या वाढ शकते. ही बाब लक्ष्यात घेऊन तुम्ही कोरोनाच्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. नियमांचे पालन करणे होत नसेल तर आपली भारत जोडो यात्रा थांबवावी.” तर दुसरीकडे भाजप भारत जोडो यात्रेला घाबरल्यामुळे ती थांबविण्याच्या हालचाली सुरू असल्याचा आरोप काँग्रेसकडून केला जात आहे.

देशात काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वात भारत जोडो यात्रा सुरू आहे. या भारत जोडो यात्रामध्ये मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते सहभागी होत आहेत. काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेचा आज 105 दिवस आहे. चीनमध्ये कोरोनाच्या संख्येत वेगाने वाढत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव देशात वाढून नये. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी भारत जोडो यात्रा स्थगित करावी, आशयाचे पत्र त्यांनी राहुल गांधींना लिहिले आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्री ट्वीटमध्ये म्हणाले, “जगातील काही देशांत पुन्हा एकदा कोरोनाची संख्या वाढत आहेत. आम्ही आज भारतातील कोरोनाच्या सध्याच्या स्थितीचा तज्ज्ञ आणि अधिकाऱ्यांच्या मार्फत आढवा घेतला आहेत. कोरोना अजूनही संपलेलान नाही. मी सर्वांनी सतर्क राहण्याचे आणि जागरुक राहावे. कोणतीही परिस्थिती हाताळण्यासाठी आम्ही तयार आहोत”, असे त्यांनी ट्वीटमध्ये म्हटले.

 

 

Exit mobile version